रोहित शर्मा आणि कपूर कुटुंबाच्या ‘या’ मुलीचं कनेक्शन काय? क्रिकेटर म्हणाला होता, ‘ती मला आवडते, पण…’
टीम इंडियाने न्यूझीलंडवर चार विकेट राखून विजय मिळवला. टीम इंडियाच जिंकणार हा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात विश्वास होता. पण रोहित शर्मा विजेतेपदानंतर निवृत्तीची घोषणा करणार की काय? अशी सुद्धा भिती होती. पण रोहित शर्मा याने अद्याप निवृत्ती घेणार नसल्याची घोषणा केली. रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आणखी एक मोठं विजेतेपद मिळवून दिल्यामुळे सर्वत्र रोहित याचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.
रोहित शर्मा आज पत्नी आणि मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा रोहित शर्मा एका बॉलिवूड अभिनेत्रीवर फिदा होता. याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, कपूर कुटुंबाची लेक आहे.
रिपोर्टनुसार, 2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शर्मा याने बॉलिवूडसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं आहे. रोहित शर्मा म्हणाला होता, ‘मी मधुबाला, वहीदा रहमान, किशोर कुमार, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे सिनेमा पाहात मोठा झालो आहे.’ यावेळी रोहित याला आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न देखील विचारण्यात आला. तेव्हा रोहित याने अभिनेत्री करीना कपूर हिचं नाव घेतलं.
करीना कपूर हिच्याबद्दल रोहित म्हणाला, ‘मला करीना कपूर आवडते. मी तिच्यासाठी वेडा होतो. मी तिचा प्रत्येक सिनेमा पाहिला आहे. तेव्हा करीना माझी क्रश होती..’ असं देखील रोहित शर्मा म्हणाला होता. रोहित बद्दल ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे.
रोहित याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तीन मुलींना डेट केल्यानंतर रोहित याने क्रिकेट मॅनेजर रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हिच्यासोबत लग्न केलं. रोहित आणि रितिका यांनी 13 डिसेंबर 2015 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर रोहित आणि रितिका यांनी चिमुकलीचं जगात स्वागत केलं. त्यांच्या मुलीचं नाव समायरा असं आहे. तर गेल्या वर्षी रितिका हिने मुलाला जन्म दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List