करीनाने फसवलं? 18 वर्षांपूर्वीचं शाहिद आणि करीनाच्या ब्रेकअपचं खरं कारण समोर

करीनाने फसवलं? 18 वर्षांपूर्वीचं शाहिद आणि करीनाच्या ब्रेकअपचं खरं कारण समोर

आयफा अवॉर्ड्स नुकताच पार पडला. या वर्षीचं आयफा अवॉर्ड्स खासच राहिलं सर्व कलाकारांनी अगदी आवर्जून हजेरी लावली. तसेच प्रत्येकजण खास लूकमध्ये आलेले पाहायला मिळाले. अख्खं बॉलिवूड एकाच मंचावर अवतरलं होतं. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करण जोहर आणि मनीष पॉल यांनी केलं. या भव्य बॉलिवूड सोहळ्यात वरुण धवन, जान्हवी कपूर आणि करीना कपूर खान सारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सर्व स्टार्स अतिशय सुंदर पोशाख घालून शोमध्ये आले होते. पण यावेळी करीना कपूरच्या देसी अवताराने सर्वांचंच मन जिंकलं. अभिनेत्री लाल रंगाची साडी घालून पुरस्कार सोहळ्यात पोहोचली. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.सोबतच चर्चा झाली ती शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या भेटीची.

18 वर्षांनी शाहिद आणि करीना पुन्हा एकत्र  

शाहिद कपूर आणि करीना कपूर हे एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय लव्हबर्ड्सपैकी एक होते. दोघांमधील प्रेमाबद्दल बरीच चर्चा झाली. दोघांनीही तीन वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर दोघेही वेगळे झाले. आता दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 8 मार्च रोजी जयपूरमध्ये झालेल्या आयफा 2025 मध्ये करीना आणि शाहिद कपूर एकत्र दिसले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली, एकमेकांशी बोलले, त्यानंतर त्यांच्याशी संबंधित सर्व जुन्या गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागल्या आहेत.

ब्रेकअप झालं तेव्हा….

करीना आणि शाहिद यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. ही जोडी पहिल्यांदा 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फिदा’ चित्रपटात एकत्र दिसली होती. या चित्रपटाच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांचे नाते 2007 पर्यंत टिकलं. त्याच वर्षी ‘जब वी मेट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.जेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं तेव्हा चाहत्यांची मोठी नाराजी झाली होती.

करीनाने शाहिदला खरंच फसवलं? 

दरम्यान शाहिद आणि करीनाला अनेकदा त्यांच्या ब्रेकअपचं कारणही विचारण्यात आलं होतं. पण दोघांनीही कधीही त्यांच्या ब्रेकअपचे कारण सांगितलं नाही आणि ते कधीही उघडपणे याबद्दल बोलले नाही. तथापि, असे म्हटले जाते की करीनाच्या एका सह-कलाकारामुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे. एका रिपोर्टनुसार करीनाने शाहिदला फसवल्याचंही म्हटलं जातं. ती दुसऱ्या एका अभिनेत्यासोबत शूटिंगसाठी बाहेर होती. त्या चित्रपटाच्या शुटींगदरम्यानच त्या अभिनेत्यामध्ये आणि करीनामध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्यात प्रेम फुललं होतं. शूटिंगनंतर करीना जेव्हा मुंबईत पोहोचली तेव्हा शाहिदला हे आधीच कळलं होतं.

तीन वर्षांचे नाते एका झटक्यात संपले

शाहिदला करीनाच्या या रिलेशनची आधीच माहिती मिळाली होती. त्यानंतरच त्यांचे नाते संपुष्टात आले आणि ते वेगळे झाले. त्यांचे तीन वर्षांचे नाते एका झटक्यात संपले. आजही दोघांच्या जुन्या कहाण्या चर्चेत असतात. आणि कुठेतरी चाहते देखील या जोडीला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असतात. ही जोडी आजही तेवढीच लोकप्रिय आहे. दरम्यान या भेटीनंतर ही जोडी पुन्हा एकदा चित्रपटामध्ये दिसणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

‘फिदा’ नंतर शाहिद आणि करीनाने ‘चुप चुप के’ आणि ’36 चायना टाउन’, ‘जब वी मेट’ मध्ये एकत्र काम केलं. मात्र ‘जब वी मेट’ मध्ये ही जोडी सर्वाधिक पसंत करण्यात आली. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात शाहिदने आदित्यची भूमिका केली होती तर करीनाने गीतची भूमिका केली होती.

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…तर उद्धव ठाकरेसह भाजपा असती सत्तेत? ती एक चूक नि युती फिस्कटली, फडणवीस यांचा कोणता मोठा गौप्यस्फोट …तर उद्धव ठाकरेसह भाजपा असती सत्तेत? ती एक चूक नि युती फिस्कटली, फडणवीस यांचा कोणता मोठा गौप्यस्फोट
Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी एक मोठा गौप्यस्फोट केला. एकसंघ शिवसेनेशी युती झाली...
रेखाचा रोमँटिक सीन सुरु असताना गावकरी भडकले; थेट सेटवर थेट बंदूक घेऊनच आले अन्…
“त्यांना माझा शाप लागेल, मी जवळच्या 5 जणांना गमावलंय..”; कोणावर भडकली प्रसिद्ध अभिनेत्री?
त्याला चिडवून झालं! आता पुरे! आता त्याला जवळ घ्या… संतोष जुवेकरच्या बचावासाठी प्रसिद्ध संगीतकाराची धाव
शाहरुख खानच्या कष्टाची पहिली कार, पण बँकेने का केली जप्त?
संसदेपर्यंत पोहोचली ‘छावा’ची जादू; पंतप्रधान नरेंद्र मोदी बघणार विकी कौशलचा चित्रपट
घटस्फोट, पोटगीची मोठी रक्कम, चहलच्या पूर्व पत्नीला रोहित शर्माच्या बायकोने मारला टोमणा? पोस्ट व्हायरल