Tariff War – कॅनडातील लोकांनी अमेरिकन टोमॅटो, सफरचंद खाणे सोडले!

Tariff War – कॅनडातील लोकांनी अमेरिकन टोमॅटो, सफरचंद खाणे सोडले!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरील आयात शुल्क पुन्हा महिनाभरासाठी पुढे ढकलले आहे. ट्रम्प यांनी 4 मार्चपासून दोन्ही देशांवर आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, कॅनडातील लोकांनी अमेरिकन टोमॅटो आणि सफरचंद खाणे सोडून दिल्याचे चित्र आहे.

याआधी ट्रम्प यांनी कॅनडावर आयात शुल्क लागू करण्याच्या धमकीसह कॅनडाला अमेरिकेचे 51 वे राज्य बनवण्याची धमकी दिली होती, तेव्हापासून कॅनडातील नागरिकांनी अमेरिकेतील उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील टोमॅटो तसेच सफरचंदही खाणे कॅनडीयन नागरिकांनी सोडून दिल्याचे वृत्त आहे. इतकेच नाही तर कॅनडातील हॉटेल्स तसेच फूड आऊटलेट्समध्ये पिझ्झामध्ये अमेरिकन टोमॅटोऐवजी इटलीतून आलेले टोमॅटो वापरण्यास सुरुवात केली आहे. अनेक दुकानदारांनी तर अमेरिकेतील उत्पादने ठेवणेच बंद केले आहे.

दरम्यान, आयात शुल्क लागू करण्याच्या निर्णयानंतर अमेरिकेतील शेअर बाजारात पडझड दिसत असून बाजार 3.6 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले.

अखेर नांगी टाकली; हिंदुस्थान आयात शुल्क कमी करण्यास तयार

हिंदुस्थान जगात सर्वाधिक आयात शुल्क आकारणारा हिंदुस्थान जगात सर्वाधिक आयात शुल्क आकारणारा देश असल्याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. हिंदुस्थान असो किंवा चीन जशास तसे आयात शुल्क आकारणारच, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जगभरात अक्षरशः लुट सुरू असून कॅनडाही अमेरिकेच्या उत्पादनांवर भरमसाट शुल्क आकारत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर
कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2...
हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 
वैष्णोदेवी दर्शनासाठी आता थेट फ्लाईट
हिंदुस्थान-फ्रान्स नौदलाचा अभ्यास
धक्कादायक! ओडिशात रोज 3 बालविवाह
नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात