सत्ताधाऱ्यांचे पाप… प्रशासनाचे अपयश; ठाण्यात रस्त्यावर नाल्यात कचऱ्याची बजबजपुरी
अनेक वर्षांपासून सत्तेत असणाऱ्यांचे पाप अन् प्रशासनाच्या अपयशामुळे ठाण्याच्या रस्त्यावर, नाल्यात कचऱ्याची अक्षरशः बजबजपुरी झाली आहे. ठाण्यातील कोरम मॉल येथील नाला, कळव्यातील महात्मा फुलेनगर, खारेगाव, भास्करनगर आणि सह्याद्री शाळेजवळील नाल्यात प्रचंड कचरा व गाळ साचलेला आहे. शहरात गेल्या आठवड्यापासून कचरा उचलला जात नसल्याने कचरा संकलनाचे व्यवस्थापन संपूर्णपणे कोलमडले आहे. वागळे येथील सीपी तलाव संकलन केंद्रावर कचरा टाकण्याला स्थानिकांनी विरोध केल्याने रस्त्यावर कचरा साचलेला दिसून येत आहे, तर दुसरीकडे नालेसफाईचे काम निविदा प्रक्रियेत अडकले असल्याने शहरातील नालेही ओव्हरफ्लो झाले असून ठाणेकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रोगराईतून पालिका प्रशासन ठाणेकरांची सुटका कधी करणार? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List