गोविंदा शेर तर पत्नी सुनीता होणार सव्वाशेर; लवकरच एका गोष्टीची घोषणा
गोविंदा बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये दिसला नाही. पण चाहते त्याच्या धमाकेदार पुनरागमनाची वाट पाहत आहेत. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असतात. अलीकडेच हे जोडपे लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण सुनीताने या बातम्यांना केवळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. तिच्या आणि गोविंदामध्ये सर्व काही ठीक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सुनीता आहुजा अभिनयाच्या जगात पाऊल ठेवणार?
मात्र आता सुनीताबद्दल अजून एक गोष्ट जी वाऱ्यासारखी पसरतेय. त्या गोष्टीची चर्चा प्रचंड प्रमाणात होताना दिसतेय ते म्हणजे सुनीताची अभिनयाकडे वाटचाल. आता सुनीता आहुजा अभिनयाच्या जगात पाऊल ठेवणार असल्याच्या बातम्या येत आहेत. एका शोच्या पुढील सीझनसाठी सुनीतासोबत चर्चा सुरू आहे.
एका शोचा भाग होणार?
रिपोर्टनुसार, सुनीता आहुजा “फॅब्युलस लाईव्हज व्हर्सेस बॉलीवूड वाइव्हज” च्या पुढील सीझनमध्ये दिसू शकते. असे मानले जाते की प्रेक्षकांना सुनीताचा बिनधास्तपणा आवडतो तसंच तिची स्टाईलही सर्वांना आवडते. तिचे फॅन फॉलोइंगही वाढत आहे. सुनीता अगदी मोकळेपणाने तिचे विचार व्यक्त करताना दिसते. तथापि, सुनीता या शोचा निश्चित भाग आहे की नाही हे अद्याप समोर आलेलं नाही तसेच सुनीतानेही यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण हे लवकरच सर्वांसमोर येईल असंही म्हटलं जात आहे.
6 महिन्यांपूर्वी सुनीताने घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया केली होती
अलिकडेच जेव्हा सुनीता गोविंदापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली तेव्हा असंही ऐकायला मिळालं की अभिनेत्याचे नाव एका मराठी अभिनेत्रीशी जोडले जात आहे. 6 महिन्यांपूर्वी सुनीताने घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याचेही समोर आलं आहे. पण नंतर दोघांमध्ये सर्व काही ठीक झालं आणि दोघेही आता त्यांच्या नात्यात आनंदी असल्याचं म्हटलं जात आहे. खरंतर, जर यांच्यात सर्व अलबेल असेल तर सुनीता आणि गोविंदा वेगवेगळ्या घरात का राहतात असा प्रश्न लोक उपस्थित करू लागले. मात्र त्याचं कारणही सुनीताने सांगितलं आहे.
कुठे तरी पत्नी पतीवर सव्वाशेर झाली
सुनीताने म्हटलं होतं की त्यांची मुलगी मोठी होत होती आणि बरेच लोक गोविंदाला भेटायला येत असत. त्याला भेटण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचा सतत ओघ सुरू होता. म्हणूनच त्यांनी दुसऱ्या घरात राहण्याचा निर्णय घेतला.गोविंदा सुनीता ज्या घरात राहते त्या घरापासून फक्त 100 पावलांच्या अंतरावर राहतो. दरम्यान जर सुनीता या रिअॅलिटी शोचा भाग बनली तर तिच्या चाहत्यांसाठी ते नक्कीच खूप मजेदार असणार आहे. तसेच कुठे तरी पत्नी पतीवर सव्वाशेर झालीच अशा गंमतीशीर कमेंट्सही व्हायरल होतील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List