शहापुरातील 35 गावांच्या घशाला कोरड, जलजीवनची कामे लटकली
होरपळून निघाले आहेत. चार दिवसांपूर्वी पाण्याच्या शोधात वणवण भटकणारा 14 वर्षाचा मुलगा कोरड्या विहिरीत पडून गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील शिंदे पाड्यात घडली होती. यानंतरही मुर्दाड शासन यंत्रणेला जाग आलेली नाही. टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी मान्य होत नसल्याने शहापूरच्या 35 गावांच्या घशाला कोरड पडली आहे.
शहापूर तालुक्यात पेयजल यासारख्या दोनशे योजना अर्धवट आहेत. ठेकेदार, भ्रष्ट अधिकारी आणि सत्ताधारी राजकारणी यांनी पैसे खाऊन पाणी योजनांचे तीनतेरा वाजवले आहेत. प्रशासनावर टीकेची झोड उठताच तांत्रिक अडचणीमुळे योजना सुरू झाल्या नसल्याची सारवासारव पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विजय पांढरे यांनी केली.
तळपत्या उन्हात पाण्याच्या शोधात
विहीर तसेच बोअरवेलच्या झात्यात पाणी जमा होईपर्यंत महिलांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. उन्हाचे चटके सहन करत दोन ते तीन किमी पायपीट करत डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी भटकंती करण्यात माया भगिनींचा दिवस जातो.
कंत्राटदारांचे 68 कोटी लाडकी बहीण योजनेकडे वळवले
जलजीवनची जी कामे पूर्ण केली त्याचे पैसे तीन वर्षांपासून अनेक कंत्राटदारांना मिळाले नाहीत. माझे तीन कामांचे अडीच कोटी रुपयांचे बिल आजतागायत न मिळाल्याने घरातील चरितार्थ चालविण्यासाठी दागिने ठेवून उदरनिर्वाह करत आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी या कामात पैसे मिळतील म्हणून घरातील आई, बहिणी, पत्नीचे दागदागिने ठेवून उधारीवर साहित्य घेऊन काम केले, पण त्यांना एकही हप्ता न मिळाल्याने ते हैराण असून नैराश्याच्या छायेत आहेत. शहापूर तालुक्याला आलेला 68 कोटींचा निधी निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेकडे वर्ग केल्याने ठेकेदारांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी 5 फेब्रुवारीपासून जलजीवन योजनेची सर्व कामे थांबवली आहेत. – अनिकेत धलपे, कंत्राटदार
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List