येमेनच्या सुमद्रात चार प्रवाशी बोटी बुडाल्या, 180 जण बेपत्ता

स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या चार बोटी गुरुवारी रात्री येमेन आणि जिबूती दरम्यान बुडाल्या. चार बोटीतील 180 प्रवाशी समुद्रात बेपत्ता झाले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने या दुर्घटनेची पुष्टी केली आहे. अद्याप बुडालेल्या प्रवाशांची ओळख पटली नाही.
सदर सागरी मार्ग हा जगातील सर्वात धोकादायक मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर अनेकदा दुर्घटना घडतात. रोजगाराच्या शोधात स्थालांतर करणारे अनेक इथोपियन नागरिक या मार्गाने आखाती देशांमध्ये जातात.
बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. 2024 मध्ये या मार्गाने एकूण 60 हजार लोकांनी प्रवास केला. त्यापैकी 558 लोकांचा दुर्घटनेत मृत्यू झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List