Ratnagiri News – खोपी येथील वणव्यात चार घरे बेचिराख; सुदैवाने जिवीतहानी टळली
रत्नागिरीतील खोपी येथे लागल्यात वणव्यात चार घरे जळून बेचिराख झाली आहे. सुदैवाने यात जिवीतहानी झालेली नाही. या वणवा वाढत गेला आणि घरे बेचिराख झाली. मात्र, तो वणवा विझवायला तिथं पाणीच नव्हतं. त्यामुळे माणसांचे आणि गुराढोरांचे जीव वाचले. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खोपी गावात घडली. गोरगरीबांचे अख्खं घर जळून खाक झाले आहे.
खोपी गावात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जाभलेवाडीत वणवा लागला. हा वणवा भडकत गेला. या वणव्यात जाभलेवाडीतील चार घरे जळून बेचिराख झाली. सुदैवाने तिथे जीवितहानी झाली नाही कारण उन्हाळा सुरू झाला की जाभलेवाडीत पाण्याचे दुर्भिक्ष होते. गावात पाणी नसल्याने जवळच्या पाणवठ्याजवळ ही कुटुंब स्थलांतरित होतात. अशीच ही चार कुटुंब पाण्यासाठी स्थलांतरित झाली होती. जाभलेवाडीतील घरात त्यांच्या वस्तू तशाच होता. वणवा लागल्यानंतर विझवायला गावात पाणी नव्हतं. त्यामुळे तो वणवा भडकत गेला. त्या आगीत चार घरे जळून खाक झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List