युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा काही तासांत होणार घटस्फोट? वकिलांकडून मोठी माहिती समोर
Yuzvendra Chahal -Dhanshree Verma divorce: भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून जोर धरत आहे. दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या असताना युजवेंद्र आणि धनश्री यांचा लवकरच घटस्फोट होईल अशी देखील माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटपटू आणि स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट कायदेशीररीत्या अंतिम झाला असून त्यासंबंधीच्या सर्व औपचारिकता गुरुवारी न्यायालयात पूर्ण केल्या जाणार आहेत… अशी माहिती देखील समोर येत आहे.
आज युजवेंद्र आणि धनश्रीला मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आल्याची देखील माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही गुरुवारी दुपारी 4.30 वाजता न्यायाधीशांसमोर हजर होतील आणि दोघांनाही कायदेशीर घटस्फोटाचं प्रमाणपत्र मिळेल… असं देखील सांगण्यात येत आहे.
दोघांनी परस्पर संमतीने घेतला घटस्फोटाचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. वांद्रे कोर्टात उपस्थित असलेल्या वकिलाने एका वृत्तवाहिनीला फोनवरून दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर दोघांमध्ये मतभेद आणि घटस्फोटाची चर्चा सुरू होती.
दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट देखील घटस्फोटाकडे इशारा देत आहे. धनश्रीने हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एका पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. स्ट्रेस टू बी ब्लेस्ड… अशी पोस्ट धनश्री हिने केली आहे.
एवढंच नाही तर, युजवेंद्र याने देखील स्टोरीवर एका पोस्ट शेअर केली आहे. ‘देवाने माझं अनेकदा रक्षण केलं आहे…’, असं क्रिकेटपटू म्हणाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री यांच्यात वाद असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. पण ही निव्वळ चर्चाच असावी असंच चाहत्यांना वाटत होतं. कारण यावर दोघं कधीच व्यक्त झाले नाहीत. पण या वर्षाच्या सुरुवातील दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं होतं. अनफॉलो केल्यानंतर चहल आणि धनश्रीने आपल्या नात्याबाबत काहीच स्पष्ट केलं नाही. अद्यापही घटस्फोटावर दोघांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List