Pune crime news – टास्कचे आमिष पडले 32 लाखांना; विमाननगरमधील तरुणीला सायबर चोरट्यांचा गंडा

Pune crime news – टास्कचे आमिष पडले 32 लाखांना; विमाननगरमधील तरुणीला सायबर चोरट्यांचा गंडा

पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी पुणेकरांना वेठीस धरले असून, उच्चशिक्षितांसह तरुण-तरुणींना जाळ्यात अडकविले जात आहे. प्रामुख्याने अर्धवेळ नोकरी, टास्कचे आमिष, लाईक-शेअरसह विविध प्रकारे सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. दिवसेंदिवस अशा घटनांमुळे ऑनलाईन व्यवहार करतानाही अनेकांच्या मनात नानाविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

पार्टटाईम जॉब करून पैसे कमविता येतील, त्यासाठी दिलेले टास्क ऑनलाईनरीत्या पूर्ण करावे लागेल, अशी बतावणी करीत सायबर चोरट्याने 32 वर्षीय तरुणीला गंडा घातला आहे. अवघ्या दोन दिवसांत सायबर चोरट्यांनी तरुणीला तब्बल 31 लाख 65 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना 17 जून ते 19 जून 2024 कालावधीत विमाननगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी विमाननगरमध्ये राहायला असून, 17 जूनला सायबर चोरट्याने तिला संपर्क केला. पार्टटाईम जॉब करून पैसे कमविता येतील, त्यासाठी दिलेले टास्क ऑनलाईनरीत्या पूर्ण करावे लागेल अशी बतावणी केली. त्यासाठी त्याने तरुणीचे बँक डिटेल्ससह इतर माहिती घेतली. त्यानंतर तिच्याकडून ऑनलाईनरीत्या 31 लाखांवर रक्कम वर्ग करून घेत फसवणूक केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिशा सालियानप्रकरणात नवा ट्विस्ट; हत्या की आत्महत्या, मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे काय दिशा सालियानप्रकरणात नवा ट्विस्ट; हत्या की आत्महत्या, मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे काय
बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरण तापलेले आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश...
श्रेयस तळपदे विरोधात FIR दाखल, अभिनेत्यावर गंभीर आरोप, जाणून बसेल मोठा धक्का
बड्या नेत्यांच्या 5 सूतगिरण्यांची तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया; सांगली जिल्हा बँकेचे 134 कोटी थकवले, पुन्हा निविदा मागविल्या
Rahuri news – किरकोळ वाद विकोपाला; माजी नगराध्यक्ष कदम यांच्यावर खुनी हल्ला, देवळाली प्रवरात तणाव
काद्यांचे दर पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे आर्थिक गणित कोलमडणार
कोलंबिया विद्यापीठानं माझा विश्वासघात केला; अमेरिकेतून ‘सेल्फ डिपोर्ट’ झालेल्या हिंदुस्थानी विद्यार्थिनीनं सांगितली आपबिती
‘संतोष’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर देशात बंदी