बनावट मतदान ओळखपत्रावरून राज्यसभेत गदारोळ
बनावट ओळखपत्रावरून आज राज्यसभेत गदारोळ झाला. बनावट ओळखपत्रावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष व इतर खासदारांनी नियम 267 अंतर्गत चर्चेची मागणी केली होती. मात्र, ही मागणी सभापतींनी फेटाळून लावली. तसेच त्यावर टिपणीही केली. त्यामुळे राज्यसभेत काही काळ गदारोळ झाला.
बनावट मतदान ओळखपत्रे बनवून भाजपने निवडणुका जिंकल्याचा आरोप विरोधी पक्ष करत असतो. याच मुद्दय़ावरून विरोधी पक्षाने सरकारला संसदेत सध्या काsंडीत पकडले आहे. मात्र, सरकार या मुद्दय़ावरून पळ काढत आहे. शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व तृणमूल कॉंग्रेस या पक्षांनी या मुद्दय़ावर आवाज उठविला आहे. मात्र, दोन्ही सभागृहांत सरकारने या मुद्दय़ावर चर्चा टाळली आहे. नियम 267 अंतर्गत तुम्ही चर्चेची मागणी केलीच कशी? अशी उलट विचारणा आज राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनी केल्यानंतर सभागृहात गदारोळ उडाला. विरोधकांनी राज्यसभा सभापती जगदीश धनखड यांच्या समोरील मोकळ्या जागेत येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात बराच काळ गदारोळ माजला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List