औरंगजेब हा मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नाही… देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमी यांना सुनावले
समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबचे गुणगान केले. त्यानंतर त्याच्या संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहे. अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांचे संपूर्ण अधिवेशापर्यंत निलंबन करण्यात आले आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमी यांना चार खडे बोल सुनावले. ‘टीव्ही 9’ समुहाच्या ‘तिसऱ्या मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिट’ बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अबू आझमी यांना जोरदार फटकार लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत आणि ‘टीव्ही भारत वर्ष’चे वरिष्ठ अँकर गौरव अगरवाल यांनी घेतली. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले. त्यांनी औरंगजेबसंदर्भातील जाणूनबुजून केले. त्यांच्या वोट बँकेतील रॅडिकल एलिमेंटला ते संदेश देऊ इच्छितात. त्यामुळे ते मुद्दाम बोलत असतात. औरंगजेबाने मंदिरे लुटली, हिंदुंवर कर लावले, महिलांचा छळ केला. संभाजी महाराजांना छळ करून मारले. हे सर्वांना माहीत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
औरंगजेब हिरो होऊ शकत नाही…
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, औरंगजेब कधीच कोणाचा हिरो होऊ शकत नाही. आपली एक परंपरा आहे. रामाला देव मानतो. श्रीकृष्णााला देव मानतो. राम आणि कृष्णाची नावे आपल्या मुलांना ठेवतो. पण औरंगजेब नावाचा एखादा व्यक्ती दाखवा. कोणी औरंगजेब हे नाव ठेवत नाही. औरंगजेब हा मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नाही.
वोट बँकेसाठी हे उद्योग
फडणवीस यांनी म्हटले की, समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशात लढणार आहे. तुष्टीकरण केल्याने अल्पसंख्यांकांना वोट बँक म्हणून वापरले जाईल, असे वाटते. परंतु आता ते होऊ शकत नाही. अखिलेश यादव यांना मी आवाहन करतो की, अखिलेश यादव यांचे पूर्वज शिवाजी महाराजांना मानणारे आहेत की औरंगजेबांना मानणारे आहेत. तुमच्या रक्तात शिवाजी महाराजांबाबत आपुलकी असेल तर तुम्ही असे म्हणूच शकत नाही.
आम्ही लोकशाहीत राहणारे लोक आहोत. लोकशाही पद्धतीने जो इलाज करायचा तो केला. आता पुढचा इलाज करायचा असेल तर तो राष्ट्रीय चॅनलवर थोडीच बोलले जाईल, असे सांगत फडणवीस यांनी या प्रकरणात आणखी कठोर भूमिका घेणार असल्याचे संदेश दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List