मध्य रेल्वेच्या ३४ अनारक्षित होळी स्पेशल ट्रेन, दादर-रत्नागिरी आणि दौंड-कलबुर्गी दरम्यान धावणार
मध्य रेल्वेने होळीच्या उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहून ३४ अनारक्षित विशेष होळी स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात गावी जाणाऱ्यांची गर्दी पाहून प्रवाशांच्या सोयीसाठी दादर- रत्नागिरी आणि दौंड – कलबुर्गी दरम्यान ३४ अनारक्षित होळी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन अनारक्षित म्हणजे जनरल तिकीटांच्या असल्याने प्रवाशांचा फायदा होणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत:
१) दादर – रत्नागिरी अनारक्षित विशेष – त्रि-साप्ताहिक (६ फेऱ्या)
ट्रेन क्र. 01131 : अनारक्षित विशेष ट्रेन दि. ११ मार्च २०२५ ( मंगळवार ), १३ मार्च २०२५ ( गुरुवार) आणि १६ मार्च २०२५ (रविवार) रोजी दादर येथून आठवड्यातून दुपारी ०२.५० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी रात्री ११.४० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या )
ट्रेन क्र. 01132 : अनारक्षित विशेष ट्रेन दि. १२ मार्च २०२५ (बुधवार), १४ मार्च २०२५ (शुक्रवार) आणि १७ मार्च २०२५ (सोमवार) रोजी रत्नागिरी येथून पहाटे ०४.३० वाजता सुटेल आणि दादर येथे त्याच दिवशी दुपारी ०१.२५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या )
थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड आणि संगमेश्वर
डब्यांची स्थिती : १४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणी आणि सामानासह गार्डस कोच
२) दौंड – कलबुर्गी अनारक्षित विशेष ट्रेन – आठवड्यातून ५ दिवस (२० फेऱ्या )
ट्रेन क्र. 01421 : अनारक्षित विशेष ट्रेन दि.१० मार्च २०२५ ते २२ मार्च २०२५ पर्यंत दौंड येथून सकाळी ०५.०० वाजता सुटेल (१३ मार्च २०२५, १६ मार्च २०२५ आणि २० मार्च २०२५ वगळता) आणि कलबुर्गी येथे त्याच दिवशी रात्री ११.२० वाजता पोहोचेल. (१० फेऱ्या )
ट्रेन क्र.01422 : ही परतीची अनारक्षित विशेष ट्रेन दि.१० मार्च २०२५ ते २२ मार्च २०२५ पर्यंत (१३ मार्च २०२५, १६ मार्च २०२५ आणि २० मार्च २०२५ वगळता) कलबुर्गी येथून सायंकाळी ०४.१० वाजता सुटेल आणि दौंड येथे त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता पोहोचेल. (१०फेऱ्या)
थांबे : भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अकलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणगापूर
डब्यांची स्थिती : १० सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणीसह सामान-सह- गार्ड्स कोच
३) दौंड-कलबुर्गी अनारक्षित विशेष – द्वि-साप्ताहिक (८ फेऱ्या )
ट्रेन क्र. 01425 अनारक्षित विशेष ट्रेन दि. ०९ मार्च २०२५, १३ मार्च २०२५, १६ मार्च ३०२५ आणि २० मार्च २०२५ (गुरुवार आणि रविवार) रोजी दौंड येथून सकाळी ५.०० वाजता सुटेल आणि कलबुर्गी येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या )
ट्रेन क्र. 01426 : अनारक्षित विशेष ट्रेन दि. ०९मार्च २०२५, १३ मार्च २०२५, १६ मार्च ३०२५ आणि २० मार्च २०२५ (गुरुवार आणि रविवार) रोजी कलबुर्गी येथून रात्री ०८.३० वाजता सुटेल आणि दौंड येथे रात्री ०२.३० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या )
थांबे : भिगवण, पारेवाडी, जेउर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अकलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणगापूर
डब्यांची स्थिती : १० सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीयसह लगेज-कम-गार्ड्स कोच
सामान्य शुल्कासह अनारक्षित विशेष गाड्यांसाठी तिकिटे यूटीएसद्वारे बुक करता येतील.
या विशेष गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाऊनलोड करा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List