मराठवाडा मित्रमंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ बिराजदार यांचे निधन
मराठवाडा मित्रमंडळाचे उपाध्यक्ष डॉ. नागनाथ वैजनाथराव बिराजदार (90) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
मूळचे उदगीर तालुक्यातील नागलगाव येथील बिराजदार यांनी उस्मानिया विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयातील डॉक्टरेट मिळविली. पुणे विद्यापीठात सहसंशोधक पदावर काम करणारे बिराजदार यांनी विभागप्रमुख म्हणूनही काम केले आहे. विद्यापीठातील अभ्यास मंडळ सदस्य, शास्त्रशाखा सदस्य आणि विविध भारतीय शास्त्र कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दिल्ली, चंदीगड, लखनौ, बर्लिन, सिडनी, लंडन, टोकियो येथे झालेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सादर केलेल्या संशोधनात्मक निबंधाची विशेष दखल घेतली गेली. सेवानिवृत्तीनंतर ते मराठवाडा मित्रमंडळाच्या कार्यात सहभागी झाले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List