नावातून फक्त एक शब्द काढल्याने 80 कोटींचे नुकसान, बिरा बिअर मेकर बी9 बेव्हेरजेस प्रायव्हेट लिमिटेडचा बोऱ्या वाजला
नावात काय आहे, असे सर्रास म्हटले जाते. परंतु, बिरा बिअर मेकर बी९ बेव्हेरजेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावातून केवळ ‘प्रायव्हेट’ हा शब्द काढून टाकल्याने कंपनीला तब्बल ८० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. बिरा ९१ हा लोकप्रिय बिअर ब्रँड आहे. हा ब्रँड २०१५ मध्ये बी९ बेव्हेरजेस प्रायव्हेट लिमिटेडकडून सुरू करण्यात आला. बिरा ९१ च्या प्रोडक्ट्समध्ये विविध प्रकारच्या बिअरचा समावेश आहे. प्रायव्हेट हा शब्द काढून टाकण्यात आल्याने आता हे नाव ‘बी9 बेव्हरेजेस लिमिटेड’ असे करण्यात आले आहे. कंपनीचा पुढील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये आयपीओ येणार आहे. आयपीओ पूर्वी कंपनीने नावात बदल केला आहे. नावातील हा बदल आता सर्व उत्पादनांवर छापावा लागणार आहे. त्यामुळे उत्पादन लेबल्सच्या पूनर्मुद्रणामुळे कंपनीची विक्री काही महिन्यांसाठी थांबवण्यात आली आहे. नाव बदलल्यामुळे कंपनीला ८० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. कंपनीचा २०२४ मध्ये आर्थिक तोटा ६८ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे.
कंपनीला ७४८ कोटींचा तोटा
२०२३ ते २४ या आर्थिक वर्षात बी९ बेव्हरेजेसला ७४८ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. नाव बदलल्यामुळे नव्या उत्पादनासाठी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागला. कंपनीला लेबलसाठी पुन्हा नोंदणी करावी लागली. राज्यांना पुन्हा अर्ज करावा लागला. उत्पादनांची मागणी असूनही विक्री झाली नाही. जेव्हा एखादी कंपनी ‘प्रायव्हेट लिमिटेड’ वरून ‘लिमिटेड’ मध्ये बदलते तेव्हा, ती खाजगी मर्यादित कंपनीतून सार्वजनिक मर्यादित कंपनीत रूपांतरित होते, म्हणजेच ती लोकांकडून भांडवल उभारू शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List