सेल्फीच्या नादात तरुणाने जीव गमावला, एक्स्प्रेसखाली चिरडून मृत्यू; बदलापूरजवळ घडली घटना
रेल्वे ट्रॅकवर सेल्फी घेताना तरुणाला कोयना एक्सप्रेसने चिरडल्याची घटना बदलापूरजवळ घडली. साहीर अली असे मयत तरुणाचे नाव आहे. साहीर मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असून अंबरनाथ येथे नातेवाईकांकडे आला होता. अंबरनाथ-बदलापूरदरम्यानच्या फ्लायओव्हरखाली सर्वांनी आधी ग्रुप फोटो घेतला, मग साहिर सेल्फी घेत होता. यादरम्यान ट्रॅकवर कोयना एक्सप्रेस येत होती.
सेल्फीमध्ये गुंग असलेल्या साहीरचे ट्रेनच्या हॉर्नकडे लक्ष नव्हते. आसपासचे लोकही साहीरला आवाज देत होते. मात्र साहीरचे लक्षच गेले नाही आणि कोयना एक्सप्रेसने त्याला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
सेल्फीच्या नादात तरुणाने जीव गमावला, एक्स्प्रेसखाली चिरडून मृत्यू; बदलापूरजवळ घडली घटना#trainaccident #badlapur
वाचा सविस्तर-
https://t.co/YKL5F6FeWK pic.twitter.com/FuL0Wm0OKG— Saamana Online (@SaamanaOnline) February 6, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List