हिना खानसाठी धावली अन् अंकिता लोखंडे फसली, रोजलिनने खेचलं कोर्टात; पुढे काय?

हिना खानसाठी धावली अन् अंकिता लोखंडे फसली, रोजलिनने खेचलं कोर्टात; पुढे काय?

अभिनेत्री रोजलिन खान ही हिना खान सारखीच कॅन्सरने ग्रस्त आहे. रोजलिनने हिना खानच्या काही स्टेटमेंटवर प्रश्न उपस्थित केले होते. ज्या कॅन्सरबाबत हिना खान लोकांना सांगत आहे, आणि जी ट्रीटमेंट हिना सांगत आहे, ती इतकीही सोपी नाहीये, असं सांगत हिनाने आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असं रोजलिन म्हणाली होती. पण हिनाने रोजलिनला कोणतंही उत्तर दिलं गेलं नाही. परंतु अंकिता लोखंडेने या वादात उडी घेऊन रोजलिनला चांगलंच फटकारलं होतं. त्यामुळे रोजलिन चांगलीच संतापली असून तिने थेट अंकितालाच अंधेरी कोर्टात खेचलं आहे. रोजलिनने तिचे वकील अली काशिफ खान यांच्या माध्यमातून मानहानीचा दावा दाखल केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर रोजलिनचे वकील अली काशिफ खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अंकिता लोखंडेच्या विरोधात मानहानीचा दावा केला आहे. रोजलिन ही एक फर्स्ट कॅन्सर पेशंट आहे. ती सध्या अनंत अडचणीचा सामना करत आहे. तिने काही लोकांना एक्सपोज करण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक आपल्याला कॅन्सर असल्याची खोटी माहिती देत आहेत. काही लोक स्टेज 2 किंवा स्टेज 3 कॅन्सरला स्टेज 4 सांगत आहे. अशा लोकांना रोजलिन एक्सपोज करणार आहे, असं तिच्या वकिलाने म्हटलं आहे. तर अंकिताने रोजलिनच्या विधानाला चीप स्टंट म्हटलं होतं.

केस दाखल

अंकिताने रोजलिन विरोधात जे म्हटलं होतं, त्याचे स्क्रीन शॉर्ट कोर्टासमोर मांडले आहेत. रोजलिन तिचं काम करत आहे. अंकिताने थर्ड पार्टी बनून तिला त्रास देण्याचं काम केलं आहे. त्यामुळेच आम्ही तिच्यावर केस दाखल केली आहे.

रोजलिन आणि तिचे वकील अली काशिफ खान दोघेही कोर्टात आले होते. दोघांनीही हिनाचं नाव घेतलं नाही. मात्र, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात हिना खानपासून सुरू झाली होती. पण रोजलिन आणि तिच्या वकिलांनी हिनाचं नाव न घेता तिच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. रोजलिनला काही लोकांना एक्सपोज करायचं होतं. काही लोक कॅन्सर सारखा आजार असल्याचं सांगून फायदा उठवण्याचं काम करत आहेत. कॅन्सरबाबतची चुकीची माहिती दिली जात आहे, असं त्यांनी म्हटलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपचे ‘लाडके’ मंत्री जयकुमार गोरेंची विकृती; स्वत:चे विवस्त्र फोटो महिलेला पाठवले भाजपचे ‘लाडके’ मंत्री जयकुमार गोरेंची विकृती; स्वत:चे विवस्त्र फोटो महिलेला पाठवले
भाजप महायुती सरकारच्या काळात राज्यात ‘लाडक्या बहिणी’ सुरक्षित नसल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. आता तर सरकारमधील मंत्र्यांनीही विकृतीचा कळस...
ताम्हिणी घाटात एसटी-कार अपघातात 2 ठार, 3 जखमी
मियां-तियां किंवा पाकिस्तानी म्हणणे चुकीचे, पण गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
कराडला मकोका, मुंडेंचा राजीनामा, मग पोलीस अधिकाऱ्यांनाच अभय का?
आकाच्या आकाचा खेळ खल्लास, अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा; तब्बल 82 दिवसांनंतर नैतिकतेची उचकी
… अन्यथा सरकारला लाडका गुंड योजना आणावी लागेल, उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला
…म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवली