हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार उद्या विधान भवनावर धडकणार

हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार उद्या विधान भवनावर धडकणार

गिरणी कामगार व वारसांना मुंबईतच आपल्या हक्काची घरे मिळवण्यासाठी संयुक्त मराठी मुंबई चळवळसहित गिरणी कामगार एकजूट संघटनेने 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान ते विधान भवन अशी महामोर्चाची हाक दिली आहे. या गिरणी कामगार महामोर्चामध्ये सात गिरणी कामगार संघटना सहभागी होणार आहेत.

ज्या गिरणी कामगारांनी या मुंबईला खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर नावारूपाला आणले त्याच गिरणी कामगारांना या मुंबईच्या बाहेर हाकलण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. दुसरीकडे सरकार उद्योगपतींना विशेष सवलत देऊन मुंबईतील मोक्याच्या जागांचे खैरातीसारखी वाटप करत आहे. याचाच निषेध करण्यासाठी येत्या 6 मार्चला आझाद मैदान ते विधान भवन असे महामोर्चाचे आयोजन गिरणी कामगार व वारसांनी केले आहे.

कोन पनवेलमधील घरांचे मेंटेनन्स माफ करा!

मेंटेनन्स माफ व्हावा या मागणीसाठी पनवेलच्या कोन गाव गिरणी कामगार समितीकडून म्हाडा आणि राज्य शासनाविरोधात बुधवारी सकाळी 11 वाजता आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारने गिरणी कामगारांना कोन गावात 320 चौरस फुटांची घरे दिली. छोटय़ा घरांसाठी वार्षिक 45 ते 55 हजारांचा मेंटेनन्स आकारला जाणार आहे. सुविधा नसताना जास्त मेटेनन्स आकारून म्हाडा गिरणी कामगारांची लूट करत असल्याचा आरोप समितीचे कार्याध्यक्ष डॉ. संतोष सावंत यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हिंदुस्थानी वाईट असतात’ म्हणत अमेरिकेत 66 वर्षीय नर्सवर रुग्णाचा हल्ला; चेहरा विद्रुप केला, दृष्टी जाण्याचा धोका ‘हिंदुस्थानी वाईट असतात’ म्हणत अमेरिकेत 66 वर्षीय नर्सवर रुग्णाचा हल्ला; चेहरा विद्रुप केला, दृष्टी जाण्याचा धोका
अमेरिकेमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानी वंशाच्या विद्यार्थ्यांवर एकामागोमाग हल्ले होत असल्याचे उघड झाले होते....
अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ युद्ध; अमेरिकेतील आयात मालावर चीनचे 15 टक्के टॅक्स
अमेरिकेत घुसखोरी करण्यासाठी गुजरातचा पटेल बनला पाकचा हुसैन
Video – धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच का घेतला नाही? – उद्धव ठाकरे
Mumbai crime news – अल्पवयीन मुलींच्या विनयभंगप्रकरणी वृद्धाला अटक
बोहल्यावर चढण्याआधीच तिचा अपघातात मृत्यू, रस्त्यावरील ऑईलने केला स्वप्नांचा चुराडा
लक्षवेधक – 1 एप्रिलपासून क्रेडिट कार्डचे नियम बदलणार