प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, ‘मी गोमांस खाणारा हिंदू…’
भारतात अनेकदा गोमांस खाण्यावर विरोध दर्शवण्यात आल्याचं चित्र समोर आलं आहे. अशात 2015 मध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याने ‘मी गोमांस खाणारा हिंदू आहे…’ असं म्हणत अन्नाला धर्माशी का जोडता? असा प्रश्न उपस्थित केला होता. असं वक्तव्य करणारे अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून दिवंगत अभिनेते ऋषी कपूर होते. जेव्हा महाराष्ट्रात गोमांसला विरोध दर्शवण्यात आल्यानंतर ऋषी कपूर यांनी स्वतःचं परखड मत मांडलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती.
2015 मध्ये ऋषी कपूर यांनी एक ट्विट केलं होतं आणि म्हणाले होते, ‘मी प्रचंड रागात आहे… अन्नाला धर्माशी का जोडता? मी गोमांस खाणारा हिंदू आहे तर याचा अर्थ असा होतो का, मी गोमांस न खाणाऱ्यापेक्षा देवाचा भक्त कमी कमी आहे? यावर जरा विचार करा…
ऋषी कपूर म्हणाले होते, ‘मी बीफ खात नाही. पण अन्नाल धर्माशी जोडणं योग्य नाही. मला सतत वाईट बोललं जात आहे. माझ्या कुटुंबाला देखील याचा सामना करावा लागत आहे. आम्ही गोहत्या करणाऱ्यांचं कुटुंब आहोत… असं भासवलं जात आहे. हा काय मूर्खपणा आहे?’
‘हिंदू संघटना मला शाहाहारी बनवू इच्छितात. पण मी तसं करणार नाही आणि ही माझी स्वतःची निवड आहे. मी भारतात गोमांस खात नाही. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यझीलंडमध्ये गुरं केवळ मांसासाठी पाळली जातात.’ असं देखील ऋषी कपूर म्हणाले होते.
‘मी भारतात गोमांस खात नाही आणि माझ्या घरात त्याची परवानगी देखील नाही. माझे 90 टक्के हिंदू मित्र गोमांस किंवा गोमांसचे पदार्थ खातात. अन्नाला धर्माशी जोडू नका… अशी विनंती आहे. मला असं वाटतं की, अन्न नाही तर माझे कर्म… मला एका चांगला व्यक्ती बनवतो. आयुष्य जगण्याचे सर्व नियम माणसाने तयार केले आहेत. मी या धार्मिक नियमांचा सन्मान करतो.. ‘
‘मी एका सच्चा हिंदू आणि देवभक्त आहे. मी गोमांस खाणाऱ्यांची वकिली करत नाही. माझं मत मांडण्याची वकिली करत आहे…’ असं देखील ऋषी कपूर म्हणाले होते. सांगायचं झालं तर, ऋषी कपूर आज जिवंत नसले तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List