FASTag Rule Change: देशात फास्टॅगचे नवीन नियम होणार लागू, टोल प्लाजावर जाण्याआधी जाणून घ्या ‘ही’ महत्त्वाची माहिती

FASTag Rule Change: देशात फास्टॅगचे नवीन नियम होणार लागू, टोल प्लाजावर जाण्याआधी जाणून घ्या ‘ही’ महत्त्वाची माहिती

जर तुम्ही देखील नियमितपणे फास्टॅग वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. नवीन वर्षात फास्टॅगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमानुसार, आता तुम्हाला तुमच्या फास्टॅगसाठी शेवटच्या क्षणी रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. विशेषतः जेव्हा ते ब्लॅकलिस्टमध्ये असेल, कारण नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशनशी संबंधित नवीन नियम अपडेट केले आहेत.

नवीन नियमांनुसार, फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशनमध्ये दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, ज्याबद्दल युजर्सला माहिती असणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा अशी परिस्थिती उद्भवू शकते जेव्हा टोलवरील फास्टॅग रीडर एरर कोड-176 दर्शवेल, ज्यामुळे फास्टॅगद्वारे टोल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. नवीन फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशन नियम काय आहेत? याबद्दल माहिती जाणून घेऊ…

FASTag साठी नवीन व्हॅलिडेशन नियम 17 फेब्रुवारी 2025 पासून लागू होईल. या नवीन नियमासाठी एनपीसीआयने गेल्या महिन्यात एक परिपत्रक जारी केले होते. ज्यामध्ये असे म्हटले होते की, जेही व्यवहार केले जातील ते रीडरच्या वेळेनुसार आणि टॅगच्या लो बॅलन्स/ब्लॅकलिस्टिंगनुसार व्हॅलिडेट केले जातील. रीडरच्या वेळेच्या 60 मिनिटे आधी आणि वेळेच्या 10 मिनिटे नंतर सक्रिय न केलेल्या टॅग्जवर केलेले व्यवहार कोड 176 वापरून नाकारले जातील.

फास्टॅग सिस्टीमनुसार अंतर्गत वाहने दोन प्रमुख टप्प्यात असतात. ज्यात व्हाइटलिस्टेड आणि ब्लॅकलिस्टेड वाहने असतात. ब्लॅकलिस्टिंग अनेक कारणांमुळे केली जाऊ शकते. यात एक महत्त्वाचं करणं म्हणजे आवश्यकतेपेक्षा कमी बॅलन्स असणं. केवायसी अपडेट न करणं आणि आरटीओ रेकॉर्डनुसार वाहनांची माहिती उपलब्ध नसणे, हे आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण
प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली. पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात...
मुंबई गोवा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, आई-मुलाला 30 फूटांपर्यंत फरफटत नेलं
आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल
धारावीतील ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण, अपात्र झोपडीधारकांचे काय होणार ?
प्रियांका चोप्राच्या वहिनीला लग्नानंतर होतोय याचा त्रास,दाखवल्या मानेवरील खुना; म्हणाली ‘हे काय चाललंय?’
एक्स गर्लफ्रेंड मलायकाचा भन्नाट डान्स पाहून अर्जून कपूरची बोलती बंद, म्हणाला, सध्या मी…
पोलीस चौकशीला रणवीर अलाहाबादिया गेलाच नाही;अखेर मुंबई पोलिसांनी घेतली पुढची अॅक्शन