डाळिंब खा आणि त्वचेवरही लावा.. वाचा डाळिंबाचे अगणित फायदे 

डाळिंब खा आणि त्वचेवरही लावा.. वाचा डाळिंबाचे अगणित फायदे 

डाळिंब केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. डाळिंबाचा रस आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा रस त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. डाळिंब पोषक तत्वांनी समृद्ध असून, त्वचेसाठी तसेच आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. डाळिंबामुळे आपल्या रक्ताचा प्रवाह वाढतो  आणि हृदयात ऑक्सिजनची पातळी वाढते. हे आपले सौंदर्य वाढविण्यास मदत करते.

कोमल त्वचेसाठी – डाळिंबाचा वापर केल्याने त्वचा कोमल होण्यास मदत होते. कोमल त्वचेसाठी आपण डाळिंबाचा फेस पॅक वापरु शकतो. याकरता डाळिंबाचे दाणे घ्यावे त्याची  पेस्ट बनवा. फेसपॅक करण्यासाठी थोडे दूध आणि मध मिसळा. हे मिश्रण एकजीव करा आणि आपला चेहरा आणि मानेवर लावा. ते 10-15 मिनिटे तसेच ठेवावे आणि कोमट पाण्याने चेहरा धुवावा. आठवड्यातून किमान एकदा हे करायलाच हवे.

डाळिंब त्वचेतून मृत पेशी दूर करतो. तसेच डाळिंब लोहाचा एक चांगला स्त्रोत मानला जातो. डाळिंबाचा उपयोग आपल्या सौंदर्याच्या सोबतीने आपल्या आहारातही करणे खूपच गरजेचे आहे.

ओठांसाठी डाळिंब – सर्वांना सुंदर ओठ हवे असतात. तुम्हाला ओठ गुलाबी आणि सुंदर ठेवायचे असतील तर नियमितपणे डाळिंबाच्या रसाचे सेवन करा. हे अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी इत्यादी समृद्ध आहे जे निरोगी ओठांसाठी खूप महत्वाचे आहे.

 तजेलदार त्वचेसाठी डाळिंब – डाळिंब तुमच्या रक्तवाहिन्या तसेच तुमच्या त्वचेच्या पेशींसाठी मोठ्या प्रमाणात खनिज पुरवतो. त्याचे पोषक घटक आपल्या हिमोग्लोबिन वाढवते. त्यामुळे त्वचेला चमक येते. डाळिंब देखील पाण्याचा चांगला स्रोत आहे. हे त्वचेला हायड्रेटेड आणि चमक ठेवण्यास मदत करते.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण
प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली. पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात...
मुंबई गोवा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, आई-मुलाला 30 फूटांपर्यंत फरफटत नेलं
आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल
धारावीतील ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण, अपात्र झोपडीधारकांचे काय होणार ?
प्रियांका चोप्राच्या वहिनीला लग्नानंतर होतोय याचा त्रास,दाखवल्या मानेवरील खुना; म्हणाली ‘हे काय चाललंय?’
एक्स गर्लफ्रेंड मलायकाचा भन्नाट डान्स पाहून अर्जून कपूरची बोलती बंद, म्हणाला, सध्या मी…
पोलीस चौकशीला रणवीर अलाहाबादिया गेलाच नाही;अखेर मुंबई पोलिसांनी घेतली पुढची अॅक्शन