lifestyle news – नियमित एक केळं खाल्ल्याने हा होईल फायदा

lifestyle news – नियमित एक केळं खाल्ल्याने हा होईल फायदा

केळं हे बाराही महिने मिळणारं फळ आहे.ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम, लोह आणि व्हिटॅमिन सी सारखे अनेक आवश्यक घटक आढळतात. जाणून घेऊया केळं खाण्याचे फायदे.

ऊर्जा मिळते

शरीरातील ऊर्जा वाढवायची असेल तर केळी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात प्रामुख्याने ग्लुकोज, फ्रक्टोज आणि सुक्रोज  सारख्या नैसर्गिक शर्करांच्या स्वरूपात कर्बोदकांमधे समृद्ध असतात.केळ्यामध्ये अनेक गुणधर्म आढळतात.जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात.

पचन

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते. त्याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. अपचनाचा त्रास असलेल्यांनी केळ्याचा आहारात समावेश करावा.

हृदयासाठी फायदेशीर

केळ्यामध्ये पोटॅशिअमची मात्रा अधिक असते. जे रक्तदाब नियंत्रणात ठेवून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

मानसिक आरोग्य

केळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन असून ते एक अमीनो अॅसिड आहे. जे शरीरात सेरोटोनिन बनवण्यासाठी मदत करते. सेरोटोनिन हे गुड संप्रेरक म्हणून ओळखले जाते आणि त्याने मूड चांगला रोहण्यास मदत होते.

वजन नियंत्रणात राहते

केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट भरलेले राहते आणि जास्त खाण्याची इच्छा होत नाही.

हाडे मजबूत राहण्यास मदत

केळ्यामध्ये  कॅल्शियम आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात,जे स्नायू आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सहकार दिंडीचे जल्लोषात स्वागत, सहकाराच्या सक्षमीकरणासाठी राज्य सहकारी बँकेकडून दहा लाखांची मदत सहकार दिंडीचे जल्लोषात स्वागत, सहकाराच्या सक्षमीकरणासाठी राज्य सहकारी बँकेकडून दहा लाखांची मदत
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने सहकारी पतसंस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीने आयोजित सहकार दिंडीचे स्वागत आज महाराष्ट्र राज्य...
थोडक्यात बातम्या – विधी सीईटीच्या परीक्षेत बदल
दादरमधील मीनाताई ठाकरे फुलबाजारात महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई विभाग क्र. 8 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर
Mahakumbh 2025 Stampede – ‘सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यायला हवा’, शंकराचार्य यांचं वक्तव्य
Swara Bhasker चे X अकाऊंट कायमचे सस्पेंड, महात्मा गांधींवर पोस्ट केल्याने झाली कारवाई?
Nitish Kumar Viral Video – महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर नितीश कुमार यांनी वाजवल्या टाळ्या, व्हायरल व्हिडीओवर विरोधक संतापले