Rishabh Pant रिषभ पंतचा जीव वाचवणाऱ्या तरुणाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न
टीम इंडियाचा गोलकिपर व फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा अपघात झाला तेव्हा त्याला गाडीतून बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात नेणाऱ्या तरुणाने त्याच्या प्रेयसीसोबत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रजत कुमार असे त्या तरुणाचे नाव आहे. या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला आहे तर रजतची प्रकृती गंभीर आहे.
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात राहणाऱ्या रजतचे मनू कश्यप या 21 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र दोघ वेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या नात्याला दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता. घरचे त्या दोघांचे लग्न त्यांच्या जातीत ठरवत होते. त्यामुळे दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही विष पिऊन आत्महत्या केली. मात्र यात तरुणीचा मृत्यू झाला तर रजतवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डिसेंबर 2022 ला रिषभ पंत दिल्लीवरून उत्तराखंडला जात असताना रुरकी येथे त्याच्या मर्सिडिजचा अपघात झाला. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला. त्यावेळी रजत व त्याचा सहकारी निशू कुमार यांनी त्याला जळत्या कारमधून बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. रिषभ पंत बरा झाल्यानंतर त्याने या दोघांनाही बाईक भेट केली होती.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List