जव्हार, मोखाडा तालुक्यांचा विकास करा होऽऽ माजी नगराध्यक्षांचा टाहो; बॅनर लावून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

जव्हार, मोखाडा तालुक्यांचा विकास करा होऽऽ माजी नगराध्यक्षांचा टाहो; बॅनर लावून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

आदिवासींच्या विकासाच्या नावाखाली दरवर्षी शेकडो कोटींचा निधी मंजूर केला जातो. मात्र हा विकास कागदावरच राहत असल्याने मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जव्हार, मोखाड्यातील जनतेला अनेक समस्यांच्या नरकयातना भोगाव्या लागत आहेत. यावरून जव्हारचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राजाराम मुकणे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली असून शहरात बॅनर लावून त्यांनी जव्हार, मोखाडा तालुक्यांचा विकास करा हो, असा टाहो फोडला आहे. सरकारला जाग आली नाही तर जनआंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतरही आदिवासी तालुक्यांचा विकास हवातसा झालेला नाही. अनेक योजना जाहीर केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने विकास कागदावरच राहिला आहे. या पार्श्वभूमीवर जव्हारचे माजी नगराध्यक्ष राजाराम मुकणे यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने आदिवासी भागाच्या प्रलंबित विकासकामांसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच केंद्रीय व राज्य मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन लक्ष वेधले आहे. मात्र आश्वासनापलीकडे ठोस असे काहीच हाती लागलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मुकणे यांनी जव्हार शहरात बॅनर लावून सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आवाज उठवला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याकडे वेधले लक्ष

ठाणे-जव्हार-नाशिक हा रेल्वेमार्ग अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. माजी रेल्वेमंत्री राम नाईक यांनी 30 जून 1999 रोजी यासंदर्भात लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही हा प्रकल्प लटकला आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली असल्याने दरवर्षी आदिवासींचे तांडे कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे या तालुक्यांचा विकास करायचा असेल तर औद्योगिक वसाहतींची निर्मिती करणे, पर्यटनस्थळांचा विकास, कृषी महाविद्यालयाची स्थापना करून प्रशिक्षण वर्ग सुरू करणे तसेच अत्याधुनिक रुग्णालयांची उभारणी, ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी जनसेवा आधारित सन्मान योजना यांसह अन्य प्रश्नांकडे मुकणे यांनी लक्ष वेधले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण
प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली. पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात...
मुंबई गोवा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, आई-मुलाला 30 फूटांपर्यंत फरफटत नेलं
आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल
धारावीतील ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण, अपात्र झोपडीधारकांचे काय होणार ?
प्रियांका चोप्राच्या वहिनीला लग्नानंतर होतोय याचा त्रास,दाखवल्या मानेवरील खुना; म्हणाली ‘हे काय चाललंय?’
एक्स गर्लफ्रेंड मलायकाचा भन्नाट डान्स पाहून अर्जून कपूरची बोलती बंद, म्हणाला, सध्या मी…
पोलीस चौकशीला रणवीर अलाहाबादिया गेलाच नाही;अखेर मुंबई पोलिसांनी घेतली पुढची अॅक्शन