सर्वोच्च न्यायालय संसदेत विरोधी पक्षांची भूमिका नाही बजावत, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे विधान
संसदेत विरोधी पक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाची भूमिका बजावणे हे न्यायपालिकेचे काम नाही असे मत माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले आहे. तसेच संविधानातील कायद्याची व्याख्या करणं आणि संविधानाचे रक्षण करणं हे सर्वोच्च न्यायालयाचे काम आहे असेही चंद्रचूड म्हणाले.
बीबीसीला दिलेल्या मुलाखातीत चंद्रचडू म्हणाले की, गेल्या आठ वर्षात आम्ही न्यायपालिकेच्या शक्तिंचा योग्य वापर केला आहे. सर्वोच्च न्यायालय फक्त एक व्यक्ती नाही तर काही लोकांचा समूह आहे. मोठ्या खटल्यावर आम्ही जेव्हा निर्णय घेतो तेव्हा आम्ही त्यावर चर्चा करायचो. मी ही बाब पुन्हा सांगतो की लोकशाही व्यवस्थेत न्यायपालिकेची भूमिका ही संसदेत विरोधी पक्षाची भूमिका पार पडणे नसते. इथे आणि खटल्यांवर निकाल देतो आणि संविधानाचे रक्षण करणे आमचं काम आहे असेही चंद्रचूड म्हणाले.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List