ईदची सार्वजनिक सुट्टी रद्द, 31 मार्चला सर्व बँका राहणार सुरू; RBI चे निर्देश
ईदच्या दिवशीही यंदा सर्व बँका सुरू राहणार आहेत. दरवर्षी ईद-उल-फित्र अर्थात रमजाद ईदच्या दिवशी देशभरातील सर्व बँकांना सार्वजनिक सुट्टी असते. मात्र यंदा ईद 31 मार्च रोजी आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आणि आर्थिक वर्ष 2024-25 मधील सर्व नोंदी पूर्णत्वास नेण्यासाठी या दिवशी 31 मार्चला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत. ‘इकॉनॉमिक्स टाईम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.
रमजान ईदच्या दिवशी हिमाचल प्रदेश आणि मिझोराम ही दोन राज्य वगळता सर्व राज्यांमध्ये 31 रोजी बँकांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र यंदा 31 मार्चच्याच दिवशी ईद आल्याने बँकांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र आर्थिक वर्ष 2024-25 मधील सर्व आर्थिक व्यवहार योग्यरित्या आणि वेळेत नोंदवले जावे यासाठी ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
सरकारचे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपते. त्यामुळे सरकारी महसूल, देयके आणि सेटलमेंटशी संबंधित सर्व व्यवहार नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असते. त्यामुळे ईदच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असली तरीही आरबीआयने सर्व बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
31 मार्चला कोणत्या बँकिंग सुविधा सुरू असणार?
– आयकर, जीएसटी, सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्कासह सरकारी कर देयके
– पेन्शन देयके आणि सरकारी अनुदाने
– सरकारी वेतन आणि भत्ते यांचे वितरण
– सरकारी योजना आणि अनुदानांशी संबंधित सार्वजनिक व्यवहार
1 एप्रिलला बँकांना सुट्टी
आरबीआयच्या निर्देशानुसार, 1 एप्रिल (मंगळवार) रोजी मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि मेघालय वगळता बहुतेक केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमधील बँका बंद राहतील.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List