उन्हाळ्यात ‘हे’ पॅक हाताला लावा आणि हातांचे सौंदर्य वाढवा.. वाचा
उन्हाळ्यामध्ये आपला चेहरा खूप टॅन होतो. पण या जोडीला आपले हातही खूप मोठ्या प्रमाणावर टॅन होत असतात. हातांना आलेला टॅनपणा घालवण्यासाठी मात्र आपण फार विचार करत नाही. पण स्लिव्हलेस ड्रेस किंवा अर्ध्या बाह्यांचे ड्रेस घातल्यावर, टॅनिंग असलेले हात खरोखर वाईट दिसतात. अशावेळी हातांचे टॅनिंग घालवण्यासाठी काही सोपे उपाय आपण घरच्या घरी करु शकतो. घरच्या घरी हाताचे टॅनिंग घालवण्यासाठी, आपल्याला जास्त खर्चही येणार नाही. त्यामुळे आता तुमच्याही हातांना टॅनिंग असेल तर हे साधेसोपे उपाय तुम्ही घरी नक्की करुन बघा.
पपई आणि मध
साहित्य- १ टीस्पून पपईची पेस्ट, १/२ टीस्पून मध
पपईची पेस्ट आणि मध मिसळून घ्या. हे मिश्रण चांगले एकजीव करा. त्यानंतर हे मिश्रण हातावर लावा. 15 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर आपले हात धुवा.
फायदे– पपईमध्ये बीटा कॅरोटीन असते, जे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करते. तर मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.
तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी
साहित्य- 1 चमचा तांदळाचे पीठ, 1 चमचा गुलाबजल
तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी एकत्र करा. आता हे मिश्रण हातांच्या त्वचेवर लावा. 10 मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल की मिश्रण सुकले आहे. नंतर साध्या पाण्याने हात धुवा. लक्षात ठेवा की हा घरगुती हॅण्ड पॅक हातात लावल्यावर हातांची हालचाल करु नका.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List