Harshwardhan Sapkal: महाराष्ट्र काँग्रेसची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्या हाती, नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर
महाराष्ट्र काँग्रेवीसची धुरा आता हर्षवर्धन सकपाळ यांची हाती असणार आहे. त्यांची महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी अलीकडेच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जो मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सकपाळ यांची वर्णी लागली आहे.
कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?
हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जातात. त्यांनी पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश व इतर राज्यांचे प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. ते सध्या राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द देऊळघाट जिल्हा परिषदेचे दोन टर्म जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, 2014 ला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार, 2019 ला त्याचा बुलढाणा विधानसभा मतदारसंघात पराभव झाला होता. महाविकास आघाडीमुळे इच्छा असताना पण ते लोकसभा व विधानसभा निवडणूक लढू शकले नाही. पक्षाचा आदेश मानून त्यांनी माघार घेतली होती. त्यांना पक्षशिस्त कामाला आल्याची चर्चा रंगत आहे.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List