Donald Trump यांनी रोखला कंडोम वितरणाचा निधी, एलन मस्क करणार चौकशी

Donald Trump यांनी रोखला कंडोम वितरणाचा निधी, एलन मस्क करणार चौकशी

बायडन प्रशासनाने गाझामध्ये मंजूर केलेला 432 कोटी निधीवर ट्रम्प सरकारने बंदी आणली आहे. बायडन प्रशासनाने गाझामध्ये कंडोम वितरणासाठी हा निधी मंजूर केला, असा आरोप व्हाईट हाऊसने केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेकडून होणाऱ्या सर्व परदेशी मदतीवर रोख लावली होती. यानंतर व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले.

गेल्या आठवड्यात एलन मस्क यांचा सरकारी कार्यक्षम विभाग (DOGE )  आणि बजेट कार्यालय (OMB ) गाझामध्ये मंजूर झालेल्या निधीची चौकशी करत आहेत, अशी माहिती लेविट यांनी पत्रकार परिषदेत दिली. यानंतरच कंडोम वाटपासाठी 3.7 कोटी डॉलर एवढी मोठी रक्कम मंजूर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यादरम्यान, बायडन प्रशासनाचे सहाय्यक सचिव अँड्र्यूज मिलर यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले. ही संपूर्ण रक्कम स्त्रीरोग आणि इतर गोष्टींसाठी मंजूर केली जाऊ शकते, असे मिलर यांनी सांगितले.

व्हाईट हाऊसच्या या वक्तव्यानंतर एलन मस्क यांनी हमासच्या या कारवाईचा अहवाल शेअर केला. यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यामध्ये जेरुसलेमची पोस्ट शेअर करत मला सांगा की सर्व कंडोम मॅग्नम का ऑर्डर केले गेले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. जेरूसलेने दिलेल्या पोस्टनुसार गाझामध्ये हमास कंडोमचा शस्त्रासारखा वापर करत आहे. 2017 मध्ये हमासने धोकादायक वायूने ​​कंडोम भरण्यास सुरुवात केली आणि ते इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात सोडले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mahakumbh 2025 Stampede – ‘सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यायला हवा’, शंकराचार्य यांचं वक्तव्य Mahakumbh 2025 Stampede – ‘सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यायला हवा’, शंकराचार्य यांचं वक्तव्य
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर येथील भाजप सरकारवर चहूबाजूंनी टीका होत आहे. राजकीय पक्षांपाठोपाठ आता संत-महंतांकडूनही यावर...
Swara Bhasker चे X अकाऊंट कायमचे सस्पेंड, महात्मा गांधींवर पोस्ट केल्याने झाली कारवाई?
Nitish Kumar Viral Video – महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर नितीश कुमार यांनी वाजवल्या टाळ्या, व्हायरल व्हिडीओवर विरोधक संतापले
MPSC Exam – संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यासाठी 40 लाख रुपयांची मागणी, परीक्षेला तात्काळ स्थगिती द्यावी; विद्यार्थ्यांची मागणी
Photo – मालिका विजयासाठी टीम इंडियाचा कसून सराव, पुण्यातील मैदानात खेळाडूंनी गाळला घाम
लाच प्रकरणातील कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन
Guillain Barre Syndrome : जीबीएस आजाराचं थैमान सुरूच, आता साताऱ्यात चार रुग्ण आढळले; गावकरी भयभीत