National Games – खो-खोत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची घोडदौड! 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; पुरुषांचा केरळवर, महिलांचा प. बंगालवर विजय

National Games – खो-खोत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची घोडदौड! 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; पुरुषांचा केरळवर, महिलांचा प. बंगालवर विजय

गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरूष व महिला या दोन्ही खो-खो संघांनी 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड अपेक्षेप्रमाणे सुरूच ठेवली. महाराष्ट्राच्या पुरूष संघाने केरळाचा, तर महिला संघाने पश्चिम बंगालचा पराभव करीत गटात अव्वल कामगिरी केली.

पुरूषांच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने केरळवर 11 गुणांनी (47-36) मात केली. मध्यंतराला महाराष्ट्राकडे 10 गुणांची (24-14) आघाडी होती. महाराष्ट्राकडून कर्णधार गजानन शेंगाळ (1.30 मि., 2 मि. संरक्षण आणि 2 गुण), राहूल मंडल (1.30 मि. संरक्षण व 10 गुण), रामजी कश्यप (1.10 मि., 1.40 मि. संरक्षण व 8 गुण), शुभम थोरात (1.40 मि., 1.25 मि. आणि 2 गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत झालेल्या केरळकडून निखिल बी (1.10 मि. संरक्षण व 10 गुण), देवनारायण (1 मि. संरक्षण व गुण) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली.

महिलांची दमदार कामगिरी

महिला गटातील सामन्यात महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगालचा एक डाव व 4 गुणांनी (24-20) धुव्वा उडविला. या एकतर्फी विजयात प्रियांका इंगळे (2.15 मि., नाबाद 1.50 मि. आणि 6 गुण), संपदा मोरे (1.30 मि. संरक्षण आणि 6 गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. याचबरोबर पायल पवार (1.40 मिनिटे संरक्षण), संध्या सुरवसे (2.55 मि. व 1.25 मि. संरक्षण आणि 2 गुण) यांनीही दमदार कामगिरी केली. पश्चिम बंगालकडून इशिता विश्वास (1.20 मि. संरक्षण व 4 गुण), दिपिका चौधरी (1.10 मि. संरक्षण आणि 4 गुण) यांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला.

रग्बीत महिलांची धडाकेबाज सुरुवात

डेहराडून येथे बुधवारी रग्बी स्पर्धांना प्रारंभ झाला. महिलांच्या गटात महाराष्ट्राने तामिळनाडूची 68-0 गोल फरकाने दाणादाण उडविली. एकतर्फी झालेल्या या लढतीमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी पूर्वार्धात 35-0 अशी जोरदार मुसंडी मारली होती.

नेमबाजीत आर्या बोरसेला पदकाची संधी

डेहराडूनमधील त्रिशूल शुटींग रेजवरील नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठून पदकाच्या आशा कायम ठेवल्या. आज झालेल्या प्राथमिक फेरीत तिने 634.5 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. हरियाणाची रमिता हिने 634.9 गुणांसह अव्वल स्थानी राहिली. आर्या ही नाशिकची खेळाडू असून, सध्या ती नवी दिल्ली येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. तिने आजपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये भरघोस पदके जिंकली आहेत. उद्या देखील ती सर्वोत्तम कामगिरी करील असा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या पथकाचे प्रशिक्षक ओंकार गोसावी यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Guillain Barre Syndrome : जीबीएस आजाराचं थैमान सुरूच, आता साताऱ्यात चार रुग्ण आढळले; गावकरी भयभीत Guillain Barre Syndrome : जीबीएस आजाराचं थैमान सुरूच, आता साताऱ्यात चार रुग्ण आढळले; गावकरी भयभीत
पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातही जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण सापडण्याचे प्रकार सुरुच आहे. पुणे,सोलापूर, नागपूर पाठापाठ आता सातारा येथे देखील...
अंगात 103 ताप असतानाही पावसात शूट केलं गाणं; माहितीये ही अभिनेत्री नक्की कोण?
वाढलेली दाडी-केस, अंगावर फाटके कपडे; आमिर खान असा रस्त्यावर का फिरतोय? ओळखणेही कठीण
lifestyle news – नियमित एक केळं खाल्ल्याने हा होईल फायदा
Manoj Jarange Patil – ‘आता समोरासमोरची लढाई होणार’, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित
राजकुमार राव अन् पत्रलेखा आई-बाबा होणार?; अभिनेत्याने इंस्टा पोस्टवर स्पष्टच सांगितलं
स्मार्ट वॉच वापरताय? ठरू शकतं जीवघेणं, कसं ते पाहा