लेख – जगाला चिरंतन प्रेरणा देणारे गांधीजी

लेख – जगाला चिरंतन प्रेरणा देणारे गांधीजी

>> प्रा. डॉ. सुभाष वाघमारे

कुठे साधे राहून देश जागृत करणारे, सत्य आणि अहिंसा मार्ग स्वीकारून माणसांचा द्वेष करता प्रवृत्तीचा द्वेष करा, असे सांगणारे निर्मळ गांधीजी आणि कुठे अनैतिक वागून देशाची जमीन, धनसंपत्ती  आपलीच म्हणून उपभोगणारे, जनतेला धमकावणारे, हुकूमशाही वर्तन करणारे, खोटारडे नेते? चारित्र्य बिघडलेल्या या काळात भारतीयत्व, सहिष्णुता, अहिंसा, साधनशुचिता अंगी बाळगणारे तसेच देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अहिंसक मार्ग निवडणारे गांधीजी हेच देशाचा नव्हे तर, जगाचा मानदंड म्हणावे लागतील.

भारतासारख्या लोकशाही देशात आज हिंसा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. देशातील अनेक नेत्यांचे वर्तन बिघडले आहे. अशा वेळी आजही गांधीजींचे विचार व आचार यांची देशाला गरज आहे. भगवान गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांचे अहिंसा विचार आजच्या काळात आवश्यक आहेत. कायद्याचे राज्य चालवण्याची जबाबदारी घेतलेले लोकच जर लोकांचे शोषण करून धाक दाखवून नेते होत असतील तर परिस्थिती गंभीर आहे. संवाद व्यवहार हा विचाराने झाला पाहिजे, पण विचाराऐवजी हत्यार दाखवून इतरांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य दाबून टाकण्याचा प्रयत्न देशातील अनेक घटनांत झालेला आहे.

गांधीजींच्या विचारात माणसे जोडण्याची, हिटलरी प्रवृत्तीविरुद्ध अहिंसा मार्गाने एकत्र येऊन न्यायासाठी, स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह करण्याची, आपले आचरण चांगले ठेवण्याची, खेड्यातील उद्योगी संस्कृतीला महत्त्व देण्याची, आपल्या मातीचा आदर करण्याची जी शक्ती आहे ते त्यांचे वेगळेपण आहे. संस्कृती जतनात ‘ईश्वर जन जो तेणे कहिये जो पीड पराई जाने रे’ हे आवश्यक आहे. ईश्वराचे खोटे स्तोम निर्माण करून वाद निर्माण करण्यापेक्षा गांधीजी हिंसक गोष्टीना विरोध करतात. स्वातंत्र्य मिळाले तरी गांधीजींनी सत्तेची पदे न स्वीकारता अहिंसा, एकोपा देशाला आवश्यक आहे हेच आयुष्यभर सांगितले. केवळ भारताचे नाहीत तर जगातल्या अनेक नेत्यांची ते प्रेरणा आहेत.

गांधीवादी काँग्रेस नेते उल्हासदादा पवार यांनी गांधीजींवर ‘महात्मा गांधी आणि जग’ हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडण्यात आले आहेत. गांधीजींचा प्रभाव जगभरात कसा आहे याची उपयुक्त माहिती या ग्रंथात आहे. हा ग्रंथ देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित करण्यात आला आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, घडामोडींशी निगडीत चिंतन लेखकाने यात केले आहे.

गांधीजींचे नीतिमान, शांतीप्रिय आणि अहिंसाप्रिय मार्ग, त्याद्वारे त्यांनी दिलेला देशाचा स्वातंत्र्य लढा यावरही लेखकाने प्रकाश टाकला आहे. गांधीजींचे विचार हे असे सर्वव्यापी असल्याने भारतानेच नव्हे तर जगाने त्या विचारांचा स्वीकार केला. त्यातूनच जगातील अनेक देशांमध्ये गांधीजींचे पुतळे उभारलेले दिसतात. अनेक देशांतील महत्त्वाच्या संग्रहालयांत गांधीजींची ठळकपणे नोंद घेतलेली दिसते.

युनोने 2 ऑक्टोबर हा गांधी जयंती ‘अहिंसा दिवस’ म्हणून जाहीर केला आहे. जगातील लेखक, नेते, महिला, वंचित घटक, युवा शक्ती, संशोधक, शिक्षणतज्ञ यांना गांधीजी प्रेरणादायक आहेतच. हो चि-मिन्ह, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, बराक ओबामा गांधीजींचे ऋण मान्य करतात. अल्बर्ट आइनस्टाईन, सर बर्नाड शॉ, रोमन रोलँड यांच्या मनात गांधीजींबद्दल आदर होता. स्त्रीस्वातंत्र्याचा आदर करणारे गांधींजी, ‘चले जाव’ या दोन शब्दांनी सारा देश जागृत करणारे गांधींजी, स्वातंत्र्य मिळाले तरी त्याच्या आनंदात मश्गुल न होता माणसात सद्भावना राहावी म्हणून प्रयत्न करणारे गांधीजी, अरुणा असफ अली यांचे योग्य शब्दांनी मनपरिवर्तन करणारे गांधीजी, देशाला जागतिक पातळीवर दूरदृष्टी देणारे गांधीजी, दोन महायुद्धे झाली तरी अहिंसेचा पुरस्कार करून जगात शाश्वत राहिलेले गांधीजी, जगातील अनेक विद्यापीठांत अभ्यासक्रमाचा विषय झालेले गांधीजी, रशिया आणि चीनसारख्या कम्युनिष्ट देशात पुतळा स्वरूपात उभे असलेले अहिंसक गांधीजी, जगावर ज्यांनी युद्ध लादले अशा इटली आणि जर्मनी या दोन्ही देशांनी केलेला गांधीजींच्या अहिंसेचा गौरव… अशी गांधीजींची किती तरी शाश्वत रूपे सांगता येतील.

गांधीजीच्या कार्याचा जगातील सामान्यातील सामान्य लोकांवर पडलेला प्रभाव, गांधीजींमुळे कृषी-उद्योग क्षेत्रात झालेले बदल, त्यांचे चारित्र्य, नेतृत्व याचा प्रभाव पडून जगातील अनेक नेत्यांनी स्वतःला ‘गांधी’ म्हणवून घेण्यात धन्यता मानली. नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसुफजाई तसेच कैलास सत्यार्थी यांनी गांधीजींना मानलेला आदर्श इत्यादी एक नव्हे अनेक बाबी उल्हासदादा पवार यांच्या ग्रंथात वाचनीय झाल्या आहेत.

कुठे साधे राहून देश जागृत करणारे, सत्य आणि अहिंसा मार्ग स्वीकारून माणसांचा द्वेष न करता प्रवृत्तीचा द्वेष करा, असे सांगणारे निर्मळ गांधीजी आणि कुठे अनैतिक वागून देशाची जमीन, धनसंपत्ती  आपलीच म्हणून उपभोगणारे, जनतेला धमकावणारे, हुकूमशाही वर्तन करणारे, खोटारडे नेते? चारित्र्य बिघडलेल्या या काळात भारतीयत्व, सहिष्णुता, अहिंसा, साधनशुचिता अंगी बाळगणारे तसेच देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अहिंसक मार्ग निवडणारे गांधीजी हेच देशाचा नव्हे तर, जगाचा मानदंड म्हणावे लागतील.

(लेखक सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख आहेत)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Guillain Barre Syndrome : जीबीएस आजाराचं थैमान सुरूच, आता साताऱ्यात चार रुग्ण आढळले; गावकरी भयभीत Guillain Barre Syndrome : जीबीएस आजाराचं थैमान सुरूच, आता साताऱ्यात चार रुग्ण आढळले; गावकरी भयभीत
पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातही जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण सापडण्याचे प्रकार सुरुच आहे. पुणे,सोलापूर, नागपूर पाठापाठ आता सातारा येथे देखील...
अंगात 103 ताप असतानाही पावसात शूट केलं गाणं; माहितीये ही अभिनेत्री नक्की कोण?
वाढलेली दाडी-केस, अंगावर फाटके कपडे; आमिर खान असा रस्त्यावर का फिरतोय? ओळखणेही कठीण
lifestyle news – नियमित एक केळं खाल्ल्याने हा होईल फायदा
Manoj Jarange Patil – ‘आता समोरासमोरची लढाई होणार’, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित
राजकुमार राव अन् पत्रलेखा आई-बाबा होणार?; अभिनेत्याने इंस्टा पोस्टवर स्पष्टच सांगितलं
स्मार्ट वॉच वापरताय? ठरू शकतं जीवघेणं, कसं ते पाहा