मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का, आणखी दोन नेते एकनाथ शिंदेंच्या गळाला

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का, आणखी दोन नेते एकनाथ शिंदेंच्या गळाला

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली होती. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. विधानसभेत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. राज्यात महायुतीचे तीन पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मिळून तब्बल 232 जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीला पन्नास जागांवरच समाधान मानावं लागलं. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता आणखी दोन धक्के शिवसेना ठाकरे गटला बसण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे दोन माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.   सुभाष बने आणि गणपत कदम यांनी काल ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने देखील मशाल सोडून धनुष्यबाण हातात घेणार आहेत. सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात ताकद आहे, तर  कदम हे राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेंसोबत माझी चर्चा झालेली नाही, आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू त्यानंतर ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहे त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातून त्यांचा पराभव करून निवडून आलेले आहेत. त्यांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे या सर्व गोष्टीचा विचार  झाल्यावरच शिंदे साहेब विचार करतील, असं सामंत यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल
राष्ट्रवादीचे दोन्ही मंत्री सध्या विरोधकांच्या रडावर आले आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी...
ही दहा वेळा साड्या बदलणारी माणसं; विखे पाटलांना संजय राऊतांचा लय बेक्कार टोला
10 हजारांचा दंड ठोठावताच उदित नारायण कोर्टात हजर, पत्नी म्हणाली, मुंबईत गेल्यावर मागे लागतात गुंड
भारतात स्त्री सुरक्षा वाऱ्यावर? भूमी पेडणकर म्हणते, ‘भारतात महिला म्हणून वावरायला भीती वाटते…’
प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी ‘छावा’ने दिला सर्वांनाच झटका; शाहरुख-रणबीरही हादरले
भावाच्या लग्नात रणबीर-आलियाच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं, म्हणाले,’संस्कार असावेत तर असे…’
प्रसिद्धीसाठी कॅन्सरबद्दल खोटं बोलल्याचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला हिना खानचं उत्तर; म्हणाली..