डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयाने शेअर बाजारात तेजी; काही तासातच गुंतवणूकदारांची 4 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण दिसत आहे. बजेटमुळे बाजारात तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, बजेटच्या दिवशीही बाजारात मोठी वाढ किंवा घसरण दिसली नाही. सोमवारी झालेल्या घसरणीनंतर मंगळवारी बाजारात तेजी आली आणि गुंतवणूकदार मालामाल झाले. मंगळवारची बाजारातील तेजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे आली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावर 25 टक्के कर लादण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. त्यांच्या निर्णयामुळे आशियाई बाजारात तेजी आली आहे. त्यांच्या एका निर्णयामुळे बाजार गॅप अप सुरू झाले आणि त्यानंतपर दिवसभर तेजी कायम होती. सुरुवातीच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 दोन्हीही तेजीसह उघडले आणि दिवसभर तेजीत व्यवहार करत होते. सेन्सेक्स 78,458.95 अंकांपर्यंत पोहचला होता. त्यात 1272.21 अकांची वाढ दिवसअखेरीस दिसून आली. तर निफ्टीही 23,742.30 वर पोहचला होता. त्यात 381.25 अंकांची वाढ झाली होती.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या शक्यतेमुळेही बाजारात तेजी आहे. रेपो दरात कपात झाल्यास बाजारावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसणार आहे. तसेच मंगळवारी आलेली तेजी या आठवड्यात काम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे मंगळवारी बाजारात तेजी दिसली. तर आता रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराच्या निर्णयामुळे ही तेजी काम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List