13-14 फूट पाण्यात उडी, अंगावर 6 किलो वजन, 11-12 तास पाण्यात शूटिंग; अभिनेत्रीची कौतुकास्पद कामगिरी
झी मराठी वाहिनीवर नव्याने येणाऱ्या 'तुला जपणार आहे' या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रोमोमध्ये मालिकेची हटके कथा पाहून त्याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या प्रोमोमध्ये एका लहान मुलीला एक बाई पाण्यात ढकलते आणि तिची आई तिथे असूनही ती मुलीची मदत करू शकत नाही. अचानक तिथे एक तरुणी येते आणि कसलाही विचार न करता पाण्यात उडी मारून लहान मुलीला वाचवते.
प्रोमोमध्ये दिसलेलं हे दृश्य पहावं तितकं सोपं नाही. हा सीन शूट करण्यामागे संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत आहे. या प्रोमोमध्ये ज्या तरुणीने लहान मुलीचा जीव वाचवला, म्हणजेच मीराची भूमिका साकारत असलेल्या महिमा म्हात्रेनं शूटिंगचा अनुभव सांगितला.
मालिकेचा तिसरा प्रोमो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण प्रोमोमध्ये वेदा पाण्यात पडते. हा सीन आम्ही साताऱ्यात शूट केला. जवळपास 13-14 फूट पाण्यात उडी मारून श्वास रोखून ठेवून त्यात चेहऱ्याचे हावभाव दाखवणं कठीण होतं," असं ती म्हणाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List