जेव्हा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान रेखा यांच्याबद्दल म्हणाले, ‘मी रेखासोबत एंजॉय केलं आणि…’
‘सिलसीला’, ‘खुन भरी मांग’, ‘उमराव जान’, ‘कोई… मिल गया’, ‘क्रिश’, ‘दिल है तुम्हाला’, ‘घर’, ‘नागीन’, ‘क्रिश 3’ यांसारख्या अनेक सिनेमात रेखा यांनी एकापेक्षा एका भूमिका साकारल्या. रेखा आजही चाहत्यांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एक काळ असा होता जेव्हा रेखा फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत होत्या. अनेक सेलिब्रिटींसोबत रेखा यांच्या नावाची चर्चा झाली. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत रेखा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा एकट्याच आयुष्य जगत आहे.
रिपोर्टनुसार, अनेक सेलिब्रिटींसोबत रेखा यांचं नाव जोडण्यात आलं. पण पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी रेखा यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. आम्ही एंजॉय केलं आणि स्वतःच्या मार्गाला लागलो… असं पाकिस्तानचे माजी पंतप्रधान म्हणाले होते. रेखा यांच्याबद्दल असं वक्तव्य करणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान दुसरे तिसरी कोणी नाही तर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान होते.
एक काळ होता जेव्हा रेखा आणि इमरान खान यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. एका मुलाखतीत खुद्द इमरान यांनी रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं. रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर इमरान खान म्हणाले होते, ‘काही काळासाठी मला रेखा यांचा सहवास आवडला होता. आम्ही एंजॉय केलं आणि स्वतःच्या मार्गाला लागलो… मला कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करायचं नव्हतं… ‘ असं देखील इमरान खान म्हणाले होते.
सांगायचं झालं तर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा एक आर्टिकल तुफान व्हायरल होत आहे. हे आर्टिकल 11 जून 1995 मधील आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, इमरान खान आणि रेखा लग्न बंधनात अडकणार आहेत. पण असं काहीही झालं नाही.
इमरान खान यांच्यासोबत असलेलं नातं रेखा यांच्या आईला देखील मान्य होतं. पण असं काही झालं नाही. इमरान खान आणि रेखा काही काळ एकत्र राहिले. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दाव्यानुसार, इमरान यांनी रेखा यांच्यासोबत मुंबईत क्वालिटी टाइम घालवला आणि दोघेही जवळपास एक महिना एकत्र राहिले मुंबईच्या बीचवर अनेकदा दोघांना स्पॉट करण्यात आलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List