ते अजूनही धक्क्यातून सावरले नाहीत…फडणवीस, पवार, शिंदे रोज एकमेकांना चिमटे काढतात, EVM चे नाव न घेता, संजय राऊतांनी काढले सोलपटून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला भाजपला पाठिंबा दिला तर विधानसभेत एकला चलो रेची भूमिका घेतली. त्यानंतर काल परवा वरळीत पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी अनेक उमेदवारांची मत गायब झाल्याचा मुद्दा समोर आणला. पूर्वी ज्या ठिकाणी हजर मत मिळायची तिथे एक सुद्धा मत मिळाल्याचा सूर त्यांनी आळवला. नेमका तोच धागा पकडत खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर तोंडसुख घेतले. सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ईव्हीएमचा उल्लेख न करता महायुतीच्या महाविजयावर पुन्हा आक्षेप घेतला. कालच सामन्यातून ईव्हीएमला कुंभमेळ्यात शाही स्नान घालून पापमुक्त करण्याचा तिरकस बाण सोडण्यात आला होता.
ते धक्क्यातून सावरले नाहीत
महायुतीचा विजय हा ईव्हीएममधून झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने होत आला आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा धागा पकडून महायुतीच्या महाविजयावर तोंडसुख घेतले. या विजयामुळे महायुतीचे नेते अजूनही धक्क्यातून सावरले नसल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे अजूनही या धक्क्यातून सावरले नाहीत. ते तिघे अजूनही एकमेकांना रोज चिमटे काढतात, आपण खरोखरच जिंकलो आहोत का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झालो आहोत का, याची खातरजमा करतात असा चिमटा राऊतांनी काढला.
राज ठाकरे यांनी फडणवीसांना भेटायला हवे
जर राज ठाकरे यांच्या मनात मतामधील गडबडीविषयी संशय असेल तर त्यांनी फडणवीस यांचा राजीनामा मागितला पाहिजे, त्यांच्यासोबत चहा कसले पिताय असा सवाल राऊतांनी केला. राज ठाकरेंनी मनातील प्रश्न घेऊन फडणवीस यांना भेटले पाहिजे. या दोघांमधील संवाद लाईव्ह दाखवायला हवा, असा चिमटा सुद्धा राऊतांनी काढला.
लक्ष्मी केवळ गौतम अदानीवर प्रसन्न
बजेटपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली. हा अर्थसंकल्प, गोरगरिबांसाठी नाही, तर गौतम अदानींसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. लक्ष्मी केवळ गौतम अदानींवर प्रसन्न असल्याचा टोला त्यांनी यावेळी हाणला. त्यांनी मोदी सरकार आणि त्यांच्या धोरणावर टीक केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List