हल्लेखोराचं टार्गेट तैमूर नव्हे ही व्यक्ती… त्या रात्री काय काय घडलं? एफआयआरमध्ये काय आहे?; वाचा संपूर्ण डिटेल्स
छोटा नवाब सैफ अली खान याची नवीन वर्षाची सुरूवातच धक्कादायक झाली. नवीन वर्षाला 15 दिवस उलटत नाही तोच त्याच्यावर बाका प्रसंग ओढावला. दोन दिवसांपूर्वी 16 जानेवारी रोजी त्याच्या घरात शिरून चोरट्याने जोरदार हंगामा केला. त्याच्यावर चाकूने सपासप 6 वार केले. त्यातील दोन वार तर जणू त्याच्या जीवावर उठले. नशीब बलवत्तर म्हणून संकट टळले. त्या रात्री, भल्या पहाटे वांद्रेतील सदगुरू शरण इमारतीच्या 12 व्या मजल्यावर घडले तरी काय? हल्लेखोराच्या निशाण्यावर होते तरी कोण? काय सांगतो FIR?
कोणी दिली तक्रार?
सैफ अली खान याच्यावर 16 फेब्रुवारी रोजी भल्या पहाटे 2 ते 2:30 वाजेदरम्यान हल्ला झाला. मानेवर आणि इतर ठिकाणी खोल जखमा झाल्याने त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पाठीत रूतलेला चाकूचा तुकडा शस्त्रक्रियेने काढण्यात आला. या सर्व घटनेची फिर्याद, सैफ याच्या घरातील स्टाफ नर्स एलियामा फिलीप यांनी दिली. तिनेच पहिल्यांदा या चोराला पाहिले होते. तिच्यावर हल्लेखोराने पहिला वार केला होता.
एलियामा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ती गेल्या चार वर्षांपासून सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्याकडे काम करते. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे घरात सैफ याचे कुटुंब 11 व्या आणि 12 व्या माळ्यावर राहते. 11 व्या मजल्यावर तीन रूम आहेत. त्यातील एक रूम सैफ आणि करीनाची आहे. दुसऱ्या रूमध्ये तैमूर आणि त्याची देखभाल करणारी आया गीता राहते. तिसऱ्या रूमध्ये लहान मुलगा जहागीर उर्फ जयबाबा आणि त्याच्या देखभालीसाठी एलियामा आणि जुनू राहतात.
अन् त्याची सावली दिसताच अंगावर काटा
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे 15 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता तिने जयबाबाला खाऊ घातले. जुनू आणि ती खालच्या बेडवर झोपली. 16 जानेवारी रोजी भल्या पहाटे 2 वाजता, कसल्या तरी आवाजाने ती उठली. तेव्हा बाथरूमचा लाईट सुरू असल्याचे आणि दरवाजा उघडा असल्याचे तिने पाहिले. करीना कपूर मुलाला पाहायला आल्या असतील म्हणून तिने डोळे लावले. पण लगेचच बाथरूमच्या दरवाज्यावर तिला टोपी घातलेल्या व्यक्तीची सावली दिसली. तिच्या अंगावर सरकन काटाच उभा राहिला.
एक कोटी दे
गडबडीमुळे जहागीर जागा झाला. तेव्हा हल्लेखोराने त्याच्या तोंडावर बोट ठेवले आणि नो आवाज असा म्हणाला. एलियामाने जहागीरजवळ धाव घेतली. जुनू पण जागी झाली. तेव्हा हल्लेखोराने गडबड न करण्याची धमकी दिली. पण जुनू ही आया ओरडतच हॉलकडे पळाली. त्यामुळे सैफ आणि करीना धावतच रूमकडे आले. आरोपीने एक करोड रुपये पाहिजे अशी मागणी केली. त्याच्या एका हातात लाकडी वस्तू तर दुसऱ्या हातात हेक्सा ब्लेड सारखी वस्तू होती. याच हत्याराने त्याने सैफ यांच्यावर हल्ला चढवला. गीता सैफ खानला वाचवायला गेली असता तिच्यावर पण त्याने हल्ला केला. सर्वांनी कशीतरी सुटका करून त्याला रूमध्ये कोंडले.
ही सर्व मंडळी लागलीच 12 व्या माळ्याकडे धावली. तोपर्यंत इतर स्टाफ पैकी रमेश, रामु आणि पासवान हे धावले. त्यांनी रूम उघडली असता हल्लेखोर नव्हता. तर तातडीने सैफ यांना रिक्षाने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List