भंडाऱ्यात आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट; 8 कामगार ठार
भंडाऱयातील जवाहर नगर परिसर लष्कराच्या आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने आज हादरला. या स्फोटात कारखान्यातील 8 कामगारांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, अक्षरशः कारखान्याचे छत कोसळले. संपूर्ण इमारत भुईसपाट झाली. स्फोटाने तीन गावे हादरली.
स्पह्ट इतका भयंकर होता की, त्याचा आवाज तब्बल 5 किलोमीटरपर्यंत गेला. स्फोटानंतर लागलेल्या आगीचे लोळ आणि धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते. स्पह्टानंतर पोलाद आणि दगडाचे तुकडे दूरपर्यंत फेकले गेले. हा स्पह्ट जवाहर नगरस्थित फॅक्टरीच्या एलटीपी सेक्शनमध्ये झाला. घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि नागपूर महापालिकेचे कर्मचारी पोहोचले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. 4 जेसीबी आणि 20 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
गेल्या वर्षीच्या स्फोटातून धडा नाही
गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्येही जवाहर नगर येथील आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट झाला होता. त्यात एक कर्मचारी ठार झाला होता. कंपनीतील सी एक्स विभागात हा स्फोट झाला होता. या वर्षीही जानेवारीमध्ये पुन्हा स्फोट झाला. पण यातून कोणताही धडा घेण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.
पीडितांना लागेल ती मदत – राजनाथ सिंह
शोकग्रस्त कुटुंबांप्रति माझ्या सहवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. घटनास्थळी बचाव पथके तैनात असून पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखर गोस्वामी (59), मनोज मेश्राम (55), अजय नागदेवे (51), अंकित बारई (21), लक्ष्मण केलवडे (38), अभिषेक चौरसिया (35), धर्मा रंगारी (35), संजय कारमोरे (35) अशी मृतांची नावे आहेत. तर एन. पी. वंजारी (55), संजय राऊत (51), राजेश बडवाईक (33), सुनील कुमार यादव (24) आणि जयदीप बॅनर्जी (42) अशी जखमींची नावे आहेत.
प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याच्या मृत्यूने हळहळ
प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱया अंकित बारई या अवघ्या 21 वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा स्फोटात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अंकित हा वाणिज्य शाखेच्या दुसऱया वर्षात शिकत होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List