सैफ अली खानच्या हल्लेखोराने कसा केला भारतात प्रवेश? आरोपीच्या वडिलांकडून धक्कादायक माहिती समोर
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपीला ठाणे येथून अटक केली आहे. हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने सैफ – करीना यांच्या घरात घुसला होता… अशी कबुली खुद्द हल्लेखोराने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहे. सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा व्यक्ती बंगाल येथील असल्याचं सिद्ध झांला आहे. शिवाय सैफ अली खान चाकू प्रकरणाच्या तपासात सिम कार्डचा लिंक बांगलादेश सीमेजवळील बंगाल गावात मिळाला.
तेथील रहिवाशांचं म्हणणं आहे की, हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील नोकऱ्यांसह इतर संधींच्या शोधात येथील तरुण मुंबईला जात असतात . मात्र बांगलादेशच्या सीमेजवळ असलेल्या पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील गावातील सिमकार्ड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केलेल्या व्यक्तीचा कसा असू शकतो… यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.
गावकऱ्यांना मात्र ते आश्चर्यकारक वाटत नाही कारण मुंबईतील हॉटेल्स आणि बार मध्ये बारा अंदुलियातील तरुण मोठ्या संख्येने काम करतात. अशाच एका ठिकाणी आरोपी शरीफुल इस्लामला देखील काम मिळाला होता. पण आता आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आरोपीचं वडील मोहम्मद रुहुल अमीन फकीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शरीफुलने गेल्या वर्षी एका मध्यस्थामार्फत भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्याने पश्चिम बंगालमधील एका हॉटेलमध्ये महिनाभर काम केले आणि त्यानंतर तो मुंबईला गेला. मुंबई पोलिसांच्या तपासात असे आढळून आले आहे की तो खुकुमोनी जहांगीर या नावाने नोंदणीकृत सिमकार्ड वापरत होता, ज्यावर बारा अंदुलिया गावाचा पत्ता आहे.
घडलेल्या घटनेवर नादिया जिल्ह्याचे अधीक्षक के अमरनाथ यांनी मोठी माहिती दिली आहे. आमच्याकडे आतापर्यंत मुंबईकडून याविषयी कोणतीही विशिष्ट माहिती नाही… असं अमरनाथ म्हणाले. ‘मुळात या भागातील रहिवासी मोठ्या संख्येने मुंबईत मजूर म्हणून काम करतात. या प्रकरणात पकडलेला आरोपी बांगलादेशी असल्याच्या वस्तुस्थितीशिवाय, आमच्याकडे असे कोणतेही पुरावे नाहीत… असं देखील ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List