मी आणि करीना बेडरूममध्ये होतो तेव्हा…, सैफ अली खानने सांगितली धक्कादायक घटना
Saif Ali Khan: मुंबई पोलीस गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ठाणे येथून अटक देखील केली आहे. दरम्यान, सैफ अली खान पोलिसांनी घडलेली घटना सांगितली आहे.16 जानेवारीच्या रात्री सैफ आणि पत्नी करीना कपूर 11 व्या मजल्यावरील त्यांच्या बेडरुमध्ये झोपले होत. तेव्हा सैफ याली मदतनीस एलियामा फिलिप यांची ओरडायचा आवाज ऐकू आला. तेव्हा सैफने हल्लेखोराला पकडलं. सैफ आणि हल्लेखोर यांच्यामध्ये हाणामारी सुरु असताना हल्लेखोराने त्याच्या पाठीत, मानेवर आणि अन्य ठिकाणी गंभीर वार केले.
मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात सैफ अली खानने म्हटले आहे की, जेव्हा त्याने एलियामा फिलिपच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला तेव्हा ते (सैफ – करीना) दोघे जहांगीरच्या खोलीकडे धावले जेथे एलियामा फिलिप देखील झोपल्या होत्या. तेथे दोघांनी एका अज्ञात व्यक्तीला पाहिलं. ‘हल्लेखोराने हल्ला केल्यानंतर मी जखमी झाले. तेव्हा मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला धक्का दिला.’
‘हाणामारी सुरु असताना एलियामा यांनी जेहला खोलीतून बाहेर काढलं आणि हल्लेखोराला खोलीत बंद केलं. सध्या घरातील प्रत्येक व्यक्ती घाबरलेली आहे. अज्ञात व्यक्ती घरात घुसला कसा? हल्लेखोराने एलियामा यांच्यावर देखील हल्ला केला.’ अशी माहिती सैफ अली खान याने पोलिसांना दिली आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
कशी आहे सैफ अली खान याची प्रकृती?
आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्याला त्याच्या घराबाहेर पहिल्यांदा स्पॉट करण्यात येतं. अभिनेता आता चालू आणि बोलू शकतो. पण त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी आणखी 1 महिना लागणार आहे. डॉक्टरांनी सैफला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला असून जड वस्तू उचलणे, व्यायाम करणे आणि शूटिंग करणे टाळन्याचा सल्ला दिला आहे.
करीना कपूर हिचा जबाब
हल्ल्यानंतर करीना कपूर हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘हल्लेखोर घरात आला. हाणामारी झाली तेव्हा हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता. घरात दागिने समोरच ठेवलेले होते. पण हल्लेखोराने दागिन्यांना हात देखील लावला नाही…’ असं अभिनेत्री म्हणाली. अशात आरोपी चोरीच्या उद्देशाने आला होता का?’ अखेर हल्लेखोराल अटक केल्यानंतर चोरीच्या उद्देशानेच अल्याचं हल्लेखोराने कबूल केलं. सध्या याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List