‘उदे गं अंबे’ मालिकेत नवा अध्याय; रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची कथा
साडेतीन शक्तिपीठांच्या निर्मितीच्या महागाथेतलं पहिलं पर्व म्हणजे मातृपीठ माहूर आणि त्याची अधिष्ठात्री रेणुका माता. रेणुका मातेच्या बालपणाचा अध्याय प्रेक्षकांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील 'उदे गं अंबे' या मालिकेत पाहिला. मालिकेत आता पुढचा अध्याय पाहायला मिळणार आहे.
रेणुका मातेने तारुण्यात पदार्पण केल्यानंतर शाकंभरी रुपात भक्तांचं रक्षण केलं. रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची गोष्ट उदे गं अंबे मालिकेतून अनुभवता येणार आहे.
पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या आदिशक्तीचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List