सैफ अली खानच्या सुरक्षेची जबाबदारी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या खांद्यावर, हल्ल्यानंतर मोठा निर्णय
Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खान याला 5 दिवसांनंतर लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 21 जानेवारी रोजी संध्याकाळी अभिनेत्याला डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून बाहेर येताच अभिनेत्याला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. झालेल्या हल्ल्यानंतर सैफच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असं असताना सैफच्या सुरक्षेची जबाबदारी प्रसिद्ध अभिनेत्याच्या खांद्यावर आहे.
सैफ अली खान याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अभिनेता रोनित रॉय याच्या खांद्यावर आहे. सैफ अली खान याने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अभिनेता रोनित रॉयच्या सुरक्षा एजन्सी निवड केली आहे. रिपोर्टनुसार, रोनित पापाराझींशी बोलताना म्हणाला, ‘सैफसोबत आम्ही पूर्वीपासून एकत्र आहोत. तो आता ठीक आहे आणि परत आला आहे.’ असं रोनित म्हणाला.
रोनित रॉयची एजन्सी करणार सैफसाठी काम
रोनित रॉय याच्या एजन्सीचं नाव Ace Security and Protection असं आहे. रोनित रॉय याच्या एजन्सीवर अनेक सेलिब्रिटींच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, करण जोहर यांसारख्या सेलिब्रिटींच्या सुरक्षेची जबाबदारी रोनित रॉय याची आहे.
सैफ याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक बदल करण्यात आलेले आहेत. अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोसायटीच्या बाल्कनीत कुणी आत जाऊ नये यासाठी जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या सोसायटीचे सुरक्षा रक्षक देखील बदलले जाऊ शकतात, ज्या एजन्सीकडे सुरक्षा रक्षकांचा करार होता तो रद्द करण्यात आला आसून रोनित रॉयच्या एजन्सीवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सैफ अली खान याची प्रकृती
सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर आहे. अभिनेता आता चालू आणि बोलू शकतो. पण त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी आणखी 1 महिना लागणार आहे. डॉक्टरांनी सैफला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला असून जड वस्तू उचलणे, व्यायाम करणे आणि शूटिंग करणे टाळन्याचा सल्ला दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List