8 लग्न,13 वर्ष बॉक्स ऑफिसवर राज्य; सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचे खासगी आयुष्य फारच चर्चेत
फिल्म इडस्ट्री म्हटलं की सेलिब्रिटींच्या चित्रपटांसोबतच त्याचे खासगी आयुष्य तेवढेच चर्चेत राहतं. त्यात बऱ्याचदा अभिनेत्रींचे करिअर आणि त्याचे वैयक्तिक आयुष्य जास्त चर्चेत राहतं. अशीच एक अभिनेत्री आहे जिचे चित्रपट तर चर्चेत राहिलेच आहेत पण त्याहीपेक्षा तिचे अफेअर आणि लग्नाच्या गोष्टीस जास्त चर्चेत राहिल्या आहेत.
8 लग्नांमुळे अभिनेत्री चर्चेत
या अभिनेत्रीने बॉक्स ऑफिसवर राज्य तर केलंच पण ती जास्त चर्चेत राहिली ते तिने केलेल्या 8 लग्नांमुळे. ही अभिनेत्री म्हणजे सौंदर्याच्याबाबतीत सर्वच अभिनेत्रींना मागे टाकणारी होती. ही अभिनेत्री आहे एलिझाबेथ टेलर.
एलिझाबेथ टेलर एक ब्रिटिश आणि अमेरिकन अभिनेत्री होती. तिने 1940 च्या दशकाच्या सुरुवातीला बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि 1950 च्या दशकात ती हॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध स्टार्सपैकी एक बनली. त्यानंतर ती 1960 च्या दशकात जगातील सर्वाधिक कमाई करणारी फिल्म स्टार बनली.
13 वर्षे बॉक्स ऑफिसवर राज्य
जोपर्यंत ती चित्रपटांमध्ये सक्रिय होती, तोपर्यंत तिचे नाव प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत होते. रिपोर्टनुसार तिने 1957 ते 1970 किंवा एकूण 13 वर्षे बॉक्स ऑफिसवर राज्य केले. ती तिच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.
एलिझाबेथचे खरे आयुष्यही रील लाईफपेक्षा कमी नव्हते. एलिझाबेथने तिच्या आयुष्यात एकूण 8 लग्ने केली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्या 8 लग्नांपैकी तिने एकाच व्यक्तीशी दोनदा लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, एलिझाबेथने पहिले लग्न कॉनराड निक्की हिल्टनशी केले, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नानंतर काही दिवसांमध्येच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले.
परस्पर भांडणामुळे एलिझाबेथने हिल्टनला घटस्फोट दिला. ते फक्त परस्पर संमतीने वेगळे झाले. हिल्टनशी घटस्फोट घेतल्यानंतर तिने मायकेल वाइल्डिंगशी लग्न केले. त्यांचे लग्न खूप चर्चेत होते कारण मायकल तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा होता. त्यानंतर काही वर्षांनी दोघांमध्ये मतभेद सुरू झाले आणि त्यानंतर एलिझाबेथ मायकल वाइल्डिंगपासून वेगळी झाली.
एकाच व्यक्तिसोबत दुसऱ्यांदा लग्न
मायकल वाइल्डिंगपासून विभक्त होताच तिच्या आयुष्यात मायकल टॉडने प्रवेश केला. काही भेटीनंतर दोघांनी लग्न केले. एलिझाबेथचे हे तिसरे लग्न होते. त्याच वेळी, काही काळानंतर मायकेल टॉडचा मृत्यू झाला, त्यानंतर एडी फिशरचा एलिझाबेथच्या आयुष्यात प्रवेश झाला.
आम्ही तुम्हाला सांगतो, फिशरचे आधीच लग्न झाले होते. असे असूनही, एलिझा आणि फिशर खूप जवळ आले आणि अखेरीस एलिझाबेथने फिशरशी चौथ्यांदा लग्न केले. त्यानंतर फिशरपासूनही विभक्त झाल्यानंतर एलिझाबेथ हॉलिवूड अभिनेता रिचर्ड बर्टनच्या प्रेमात पडली.
असे म्हटले जाते की एलिझाबेथ आणि रिचर्ड बर्टन या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने लग्न केले. एलिझाचे हे पाचवे लग्न होते. पण तिचे रिचर्ड बर्टनसोबतचे लग्नही फार काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला.
एलिझाबेथ आणि रिचर्ड यांच्यातील प्रेमाने त्यांना पुन्हा जवळ आणले आणि घटस्फोटाच्या सुमारे दीड वर्षानंतर दोघांनी पुन्हा लग्न केले. एलिझाबेथचे हे सहावे लग्न होते. यानंतर एलिझाबेथने जॉन वॉर्नरशी पुन्हा सातवे लग्न केले, परंतु काही दिवसांतच दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यांचे नाते विभक्त होण्याच्या दिशेने गेले आणि शेवटी दोघेही वेगळे झाले. एलिझाचे शेवटचे आणि आठवे लग्न लॅरी फोर्टेंस्कीशी झाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List