बिस्किट देताच माडकाचं पिल्लू बॉलिवूड अभिनेत्रीच्या मांडीवर येऊन बसलं अन्…; व्हिडिओ व्हायरल
सध्या बॉलिवूडमध्ये अजून एक चेहरा प्रेक्षकांच्या मनात भरला आहे तो म्हणजे पंजाबमधून मुंबईत आलेल्या वामिका गब्बी या अभिनेत्रीचा. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ या चित्रपटात वामिका मुख्य भूमिकेत दिसली होती. वामिका बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी पंजाबी चित्रपटांमध्ये काम करत होती. चित्रपटांसोबतच ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.
वामिकाचा एक क्यूट व्हिडिओ व्हायरल
नुकताच वामिकाचा एक क्यूट व्हिडिओ तिच्या फॅन पेजवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका माकडाच्या पिल्लाला बिस्किट खाऊ घालताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की वामिका माकडाच्या पिल्लाजवळ जाऊन त्याला बिस्किट देत आहे तर तिचे बॉडिगार्ड तिच्या मागे उभे राहिलेले दिसत आहेत.
माकडाच्या पिल्लाला बिस्किट खाऊ घालतानाचा व्हिडीओ
वामिका माकडाच्या पिल्लाजवळ बसून त्याला बिस्किट देते ते बिस्किट घेताना ते माकडाचं पिल्लू थेट वामिकाच्या मांडीवर जाऊन बसतं आणि बिस्किट खाण्यास सुरुवात करतं. हे पाहून वामिका आनंदाने हसायला लागते.
वामिकाच्या व्हिडिओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वामिका गब्बीचा हा व्हिडीओ चाहत्यांनाही आवडला आहे आणि व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्रीच्या व्हिडिओवर एका युजरने लिहिले आहे “खूप गोड.” दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलं आहे, “वामिका ही खरी सुंदरता आहे.” याशिवाय अनेकांनी पोस्टवर अनेक हार्टचे इमोजी पाठवले आहे.
वामिका गब्बीच्या कामाबद्दल…
वामिका गब्बीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने दिलजीत दोसांझसोबत काही पंजाबी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे.
वामिका गब्बी गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सतत सक्रिय आहे. विशाल भारद्वाजच्या ‘चार्ली चोप्रा’ या वेबसिरीजमध्ये देखील अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय ती प्राइम व्हिडिओच्या ‘जुबली’ या वेब सीरिजमध्येही दिसली होती. पण आता वामिका बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा बनली असून तिची फॅन फॉलोईंगही वाढताना दिसत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List