गाडीतून उतरला, हॅलो केलं अन् स्वत:च्या पायाने…; सैफ अली खानची पहिली झलक समोर
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ला झाल्यानंतर अखेर 6 दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.
रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर सैफ अली खान हा बाजूला असलेल्या फॉर्च्युन हाइट्समध्ये राहण्यासाठी जाणार आहे. हे त्याचं दुसरं घर असून ते वांद्र्यातील त्याच्या राहत्या निवासस्थानाच्या बाजूला आहे.
सैफ अली खान हा त्याच्या कारने लिलावती रुग्णालयातून घरी परतला. यावेळी तो कारमध्ये फ्रंट सीटवर बसला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List