रेणुका शहाणेंची मुले फारच संस्कारी; आईच्या आदेशाचं पालन; मुलांचा साधेपणा नेटकऱ्यांना भावला
आजही आपल्या गोड अन् हसऱ्या चेहऱ्यानं सर्वांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. ‘हम आप है कौन’ नंतर तर रेणुका शहाणे इतक्या प्रसिद्धी झोतात आल्या की आजही त्यांची तीच साधी-सरळ अन् मनाला भावणारी भूमिका सर्वांच्या मनात आहे.
पहिल्यांदाच रेणुका आपल्या दोन्ही मुलांसोबत स्पॉट
रेणुका शहाणे अभिनेत्री असण्यासोबतच त्या दिग्दर्शिकाही आहेत. रेणुका आणि त्याचे पती आशुतोष राणा हे नेहमीच एकत्र स्पॉट होत असतात. तर रिअॅलिटी शोंमध्येही हजेरी लावताना दिसतात. तसेच एकमेकांबद्दलचे किस्सेही शेअर करताना दिसतात. पण त्यांच्या मुलांबद्दल फार लोकांना माहित नाही.
तसेच त्यांना कुठे फार स्पॉटही केलेलं कधी दिसलं नाही. पण कदाचित पहिल्यांदाच रेणुका शहाणे या आपल्या दोन्ही मुलांसोबत स्पॉट झाल्या आहेत. शौर्यमान राणा आणि सत्येंद्र राणा अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.
रेणुका शहाणे मुंबई विमातळावर आपल्या दोन्ही मुलांसोबत दिसल्या. रेणुका शहाणेंचा सुंदर पेहराव आणि मुलांचा साधेपणा पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत.रेणुका शहाणे कधीही दिसल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच दिलखुलास हास्य असतं.
मुलांवर चांगल्या संस्कारांचा पगडा
सर्वांशी हसत खेळत बोलतानाही त्या दिसतात. नुकत्याच त्या मुंबई विमानतळावर स्पॉट झाल्या. यावेळी त्यांनी लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती, ज्यात त्या खूप सुंदर दिसत होत्या. अगदी भारतीय परंपरेनुसार त्यांनी पेहराव केला होता.
तर त्यांच्या दोन्ही मुलांनी कुर्ता पायजमा घातला होता. ज्यात त्याची दोन मुलंही उंच, स्मार्ट दिसत होती. तिघांनी पापाराझींसमोर हसतच पोज दिली. मुख्य म्हणजे पापाराझींनी फोटोसाठी बोलवल्यानंतर आधी रेणुका शहाणेच फोटोंसाठी आल्या मात्र त्यांची दोन्ही तशीच मागे उभी होती. जेव्हा आईने त्यांना बोलावलं तेव्हाच ते फोटोसाठी गेले. यावेळी दोन्ही मुलं आईच्या दोन्ही बाजूला उभी होती.
रेणुका यांच्या मुलांचा साधेपणा नेटकऱ्यांना भावला
रेणुका यांच्या मुलांचे हे संस्कार आणि त्यांचा साधेपणा पाहून सर्वजण त्यांचं कौतुक करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एकाने कमेंट केली आहे की ‘संस्कार असावे तर असे, तर एकाने रेणुका यांच्या स्लामईलवर कमेंट करत म्हटलं आहे की, ‘स्माईल तर आजही तशीच आहे’.
तर, एका युजरने त्यांच्या मुलांसाठी कमेंट करत म्हटलं, ‘आजच्या जमान्यातही संस्कार ठळक दिसत आहेत’, ‘मुलांना चांगलं वाढवलंय’ अशा नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.
रेणुका शहाणे यांनी 2001 साली अभिनेते आशुतोष राणा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. हे त्यांचं दुसरं लग्न आहे. आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे इंडस्ट्रीतलं गोड कपल आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List