4 वर्षात एकही चपाती खाल्ली नाही; एवढं कठीण डाएट, 51 व्या वर्षीही हा अभिनेता दिसतो तिशीतला

4 वर्षात एकही चपाती खाल्ली नाही; एवढं कठीण डाएट, 51 व्या वर्षीही हा अभिनेता दिसतो तिशीतला

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींप्रमाणे अभिनेत्यांनाही आपल्या डाएटची काळजी घ्यावी लागते. त्यांनाही तेवढंच आपल्या खाण्या-पिण्यावर लक्ष द्यावं लागतं. तसे अनेक अभिनेते आहेत जे खाण्याच्या सवयीपासून ते वर्कआउटपर्यंत सर्वांची काळजी घेतात. पण एक असा अभिनेता आहे जो एवढा कठीण डाएट फॉलो करतो की त्याने चक्क 4 वर्षांत एकही चपाती खाल्ली नाहीये.

सोनूसाठी त्याच्या फिटनेस अतिशय महत्त्वाचा

हा अभिनेता म्हणजे सोनू सूद. सोनूसाठी त्याच्या फिटनेस अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचे डायट शेड्युल खूप कठीण आहे तसेच ते फॉलो करणंही खूप कठीण आहे. इतकंच नाही तर फिटनेसमध्ये ते इतर अनेक लोकप्रिय कलाकारांना मागे टाकतो. तो त्याच्या खाण्या-पिण्याची प्रचंड काळजी घेतो.

सोनू सूद हा 51 वर्षांचा आहे. बोलायचं झालं तर सध्या तो त्याचा आगामी चित्रपट ‘फतेह’ ला घेऊन चर्चेत आहेत. याच चित्रपटाचं तो प्रमोशन करत आहे.

त्यानं अनेक चित्रपटांमधून त्याच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. फिटनेसमध्ये तो सलमान खान, जॉन, हृतिक रोशन यांना टक्कर देतो. त्याच्या डायटप्लॅनची चर्चाही झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)


सोनूला कोणतही व्यसन नाहीये

सोनूला कोणतही व्यसन नाहीये. त्याने स्वत:च एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने आजपर्यंत दारूचा एक घोटही प्यायला नाहीये. त्याने एक किस्साही सांगितला होता की, एकदा सलमान खानच्या पार्टीमध्ये त्याला एनर्जी ड्रिंकमध्ये दारू मिक्स करून प्यायला दिली होती. जेणे करून त्याला त्याची टेस्ट कळणार नाही.

सोनू हा शाकाहारी आहे आणि त्याचं डायट खूप साधारण आहे. त्यानं सांगितलं की कोणी घरी आलं तर ते त्याचं जेवण पाहून म्हणतात की हे जेवण रुग्णालयात खातात. सोनूच्या म्हणण्यानुसार, घरात फक्त तो एकटाच शाकाहारी आहे. एवढचं नाही तर त्यानं डाएटमुळे 4 वर्षात एकही चपाती खाल्ली नाही. तसेच त्याला दुपारी त्याला डाळ-भात खायला आवडतं.

सोनू नाश्त्यामध्ये खातो….

त्यासोबत सोनूला नाश्त्यामध्ये एग व्हाईट, ऑमलेट, सॅलेड, आव्होकाडो, फ्राय केलेल्या भाज्या किंवा पपई खायला आवडतं. त्याचं म्हणणं आहे की तो त्याच्या डायटमध्ये कधी चीट करत नाही. मात्र, कधी कधी तो मक्याची भाकरी खातो, कारण त्याचं म्हणणं आहे की कंसिस्टंसी असणं गरजेचं आहे.

रुग्णालयात मिळणारं जेवण करणं योग्य पर्याय 

फिटनेसला घेऊन सोनू म्हणाला, त्याचं म्हणणं आहे की एक योग्य डायट आणि नियमितपणे वर्कआऊट करणं शरीराला स्वस्थ ठेवू शकतं. त्याचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारे आरोग्या संबंधीत काही सवयी आहेत ज्या नियमितपणे करणे गरजेचं आहे. जेणेकरून खूप काळ ते फिट राहतील.

त्यासोबत तो म्हणाला की जर निरोगी राहायचं असेल तर रुग्णालयात मिळणारं जेवण करणं योग्य पर्याय आहे. दरम्यान, त्याचा ‘फतेह’ हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांचा शिलेदार अडचणीत? लक्ष्मण हाकेंनी सांगितलं वाल्मिक कराड यांचं धस कनेक्शन, मोठा दावा फडणवीसांचा शिलेदार अडचणीत? लक्ष्मण हाकेंनी सांगितलं वाल्मिक कराड यांचं धस कनेक्शन, मोठा दावा
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं  संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच निदर्शन आंदोलन करण्यात...
बाप-लेकीला सोडून दादांसोबत चला, शरद पवार गटाच्या खासदारांना तटकरे यांचा सल्ला?
‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये अप्पी-अर्जुनची राजकारण्यांशी लढाई; कथा रंजक वळणावर
‘तुम्ही इमर्जन्सी हा चित्रपट पहायला हवा’; कंगना यांचं ऐकताच प्रियंका गांधींनी दिलं असं उत्तर
रॅबिट फीव्हर म्हणजे काय? लक्षणे कोणती? जाणून घ्या
या लोकांसाठी ओला मटार म्हणजे विषासमान; चुकूनही खाऊ नका अन्यथा…
Video – अजितदादांच्या पक्षातील प्रमुख नेते साहेबांचा आदर करतात, तटकरेंचं सांगता येत नाही!