विकी कौशलचा ‘छावा’मधील अंगावर काटा आणणारा लूक; दिसणार छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत
अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला 'छावा' हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विकी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
'अग्नि भी वो, पानी भी वो, तुफान भी वो, शेर शिवा छावा है वो...' असं म्हणत ‘मॅडॉक फिम्स’ने ‘छावा’ या चित्रपटातील विकी कौशलचे विविध लूक प्रेक्षकांसमोर आणले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचं औचित्य साधून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं.
यामध्ये अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत सिंहासनावर बसलेला दिसून येत आहे. या पोस्टरने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. यामध्ये विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या आधीही छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती, मात्र संपूर्ण भारतभर मोठ्या पातळीवर छत्रपती संभाजी महाराजांची कथा मांडण्यात दिग्दर्शक - निर्मात्यांना यश आलं नव्हतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List