पहाटेच्या शपथविधीच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? भुजबळांनी सांगितल्या पडद्या मागच्या घडामोडी

पहाटेच्या शपथविधीच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? भुजबळांनी सांगितल्या पडद्या मागच्या घडामोडी

मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात बोलताना धनंजय मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा दावा केला आहे. पहाटेचा शपथविधी जेव्हा झाला तेव्हा मी अजितदादांच्या पायावर डोक ठेवून म्हणालो दादा आपण जायला नको, पुढे मोठा धोका आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी पहाटेच्या शपथविधीपूर्वी नेमकं काय- काय घडलं त्याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं भाषण झालं तेव्हा मी तीथे नव्हतो.  परंतु आपल्या माध्यमातून सांगतो, ते षडयंत्र होतं तर ते कोणी रचलं होतं? एक तर उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाहीत. मग  कोणी रचल,  काँग्रेस रचू शकत नाही मग हे काही राष्ट्रवादीच्या लोकांनी रचलं की भाजपच्या लोकांनी षडयंत्र रचलं याची काहीच माहिती नाही.  मला एवढं मात्र आठवतं. की त्यावेळेला आमच्या बैठका सुरू होत्या.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये बैठका सुरू होत्या. यातीलच एका बैठकीमध्ये शरद पवार साहेब आणि खर्गेंचा थोडासा वाद झाला, त्यानंतर पवार साहेब बैठकीमधून रागानं निघून गेले. मात्र त्यानंतरही आमच्या बैठका सुरूच राहिल्या. रात्री आठ वाजता मिटिंग बोलावली गेली, त्या मिटिंगला अजितदादा काही हजर नव्हते. म्हटलं कुठेतरी कामात अडकले असतील. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा टीव्ही लावला तेव्हा कळालं की अजितदादांचा शपथविधी झाला. त्यानंतर मी पवार साहेबांकडे गेलो. तोपर्यंत पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता, आणि सांगितलं होतं की आपण आता मजबुतीनं उभं राहिला हवं, काहीही घडता कामा नये. असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेक-अप, कर्ली हेअर; महाकुंभातील रुद्राक्ष विकणारी मोनालिसा थेट सेलिब्रिटी; मेकओव्हर पाहून ओळखणं कठीण मेक-अप, कर्ली हेअर; महाकुंभातील रुद्राक्ष विकणारी मोनालिसा थेट सेलिब्रिटी; मेकओव्हर पाहून ओळखणं कठीण
महाकुंभमध्ये अनेकजण चर्चेचा विषय बनताना पाहायला मिळत आहेत. मग त्यात साध्वी असो किंवा मग नागासाधू, प्रत्येकांची वेगळी वेगळी कहाणी आहे....
सहा ते दहा महिन्यांच्या मुलांच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश, बाळाचा शारीरिक विकास होऊन वाढेल रोगप्रतिकारक शक्ती
बांगलादेशींची घुसखोरी हे भाजपचे अपयश, आदित्य ठाकरे यांची टीका
दिनेश वाघमारे राज्याचे नवे निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर नियुक्ती
रोहित शर्मा रणजी खेळणार, मुंबईच्या संघात निवड; जम्मू कश्मीर विरूद्ध मैदानात उतरणार
हे सरकार वादे पूर्ण नाही करत पण वाद घालण्यात व्यस्त आहे – आदित्य ठाकरे
पहाटेच्या शपथविधीच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? भुजबळांनी सांगितल्या पडद्या मागच्या घडामोडी