मोठी बातमी! धनंजय मुंडे राजीनामा देणार? अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचले, घडामोडींना वेग

मोठी बातमी! धनंजय मुंडे राजीनामा देणार? अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचले, घडामोडींना वेग

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. या प्रकरणात आज सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राज्यपालांकडे सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणात दबाव वाढत आहे.

दरम्यान मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. धनंजय मुंडे हे  अजितदादांच्या मंत्रालयातील दालनात त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. अजित पवार आता या प्रकरणात नेमका काय निर्णय घेणार? दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा सुरू आहे?  याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट  

दरम्यान आज सर्वपक्षीय नेत्यांकडून आज राज्यपालांची भेट घेण्यात आली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. या प्रकरणात आपण लक्ष घालू असं आश्वासन देखील यावर राज्यपालांकडून देण्यात आलं आहे. आता उद्या सर्वजण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहोत अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

सुरेश धस यांची आक्रमक भूमिका

भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. एवढंच नाही तर अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत आहेत, असा आरोपही यावेळी सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गर्भवती स्त्रीने बाजरीची भाकरी खावी की नाही? जाणून घ्या काय आहे तज्ञांचे मत गर्भवती स्त्रीने बाजरीची भाकरी खावी की नाही? जाणून घ्या काय आहे तज्ञांचे मत
गरोदरपणात महिलांना स्वतःची तसेच पोटातील बाळाची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. गर्भधारणेचा संपूर्ण कालावधी महिलांसाठी कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नसतो. या...
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट
‘बांगलादेशी महीला लॉजवर पकडल्या पण…,’ नितेश राणेंचा सनसनाटी आरोप काय?
‘पाऊस पडत होता त्यामुळे गन पावडर सापडली नसावी’, अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात गृह राज्यमंत्र्यांचं तर्कट
Ratnagiri – 61 लाखांचा गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना हैद्राबाद येथून अटक
मेक-अप, कर्ली हेअर; महाकुंभातील रुद्राक्ष विकणारी मोनालिसा थेट सेलिब्रिटी; मेकओव्हर पाहून ओळखणं कठीण
सहा ते दहा महिन्यांच्या मुलांच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश, बाळाचा शारीरिक विकास होऊन वाढेल रोगप्रतिकारक शक्ती